नीतिवचनं ८:१-३६

  • बुद्धी व्यक्‍तीरूपात बोलते (१-३६)

    • देवाच्या फार पूर्वीच्या कार्यांपैकी मी पहिली होते (२२)

    • एका कुशल कारागिरासारखी मी देवासोबत होते (३०)

    • “मानवांबद्दल मला खूप जिव्हाळा होता” (३१)

 बुद्धी हाक मारत आहेआणि समंजसपणा मोठ्याने पुकारत आहे.+  २  ती चौकांमध्ये, रस्त्याच्या कडेलाउंच ठिकाणांवर+ उभी राहते.  ३  शहराच्या फाटकांजवळ,प्रवेशद्वारांजवळ,ती मोठ्या आवाजात म्हणते:+  ४  “लोकांनो, मी तुम्हाला हाक मारते;मी तुम्हा सर्वांना असं सांगते:  ५  भोळ्याभाबड्यांनो,* शहाणपण शिका,+मूर्खांनो, समजशक्‍ती असलेलं मन उत्पन्‍न करा.  ६  ऐका, कारण मी जे सांगत आहे ते महत्त्वाचं आहे,माझ्या ओठांतून निघणाऱ्‍या गोष्टी योग्य आहेत.  ७  मी हळू आवाजात सत्याची वचनं बोलते,माझ्या ओठांना दुष्टपणाच्या गोष्टींची घृणा वाटते.  ८  माझ्या तोंडून फक्‍त नीतीचे बोल निघतात. त्यांपैकी कोणतेही फसवे किंवा कपटी नाहीत.  ९  ते प्रामाणिक आहेत हे समंजस लोकांना कळतं,आणि ते योग्य आहेत हे ज्ञानी लोक ओळखतात. १०  चांदीपेक्षा माझं शिक्षण निवडाआणि सगळ्यात उत्कृष्ट सोन्यापेक्षा ज्ञान निवडा.+ ११  कारण बुद्धी पोवळ्यांपेक्षा* उत्तम आहे;कोणत्याही मौल्यवान गोष्टींची तिच्याशी तुलना होऊ शकत नाही. १२  मी म्हणजे बुद्धी, शहाणपणासोबत राहते;मला ज्ञान आणि विचारशक्‍ती सापडली आहे.+ १३  यहोवाची भीती बाळगणं म्हणजे वाइटाचा द्वेष करणं.+ अहंकार, गर्व,+ दुष्टपणा आणि कपटीपणाच्या गोष्टी+ यांचा मला तिटकारा आहे. १४  माझ्याजवळ चांगला सल्ला आणि व्यावहारिक बुद्धी आहे;+समजशक्‍ती+ आणि ताकद+ माझ्याजवळ आहे. १५  माझ्यामुळे राजे राज्य करतातआणि उच्च अधिकारी नीतिमान आदेश देतात.+ १६  माझ्यामुळेच शासक राज्य करतातआणि अधिकारी नीतीने न्याय करतात. १७  जे माझ्यावर प्रेम करतात त्यांच्यावर मी प्रेम करतेआणि जे मला शोधतात त्यांना मी सापडेन.+ १८  माझ्याजवळ धनसंपत्ती आणि गौरव;टिकणारं धन* आणि नीतिमत्त्व आहे. १९  माझ्या देणग्या सोन्यापेक्षा, शुद्ध सोन्यापेक्षा मौल्यवान असतात,आणि मी दिलेल्या गोष्टी सगळ्यात उत्तम चांदीपेक्षाही चांगल्याअसतात.+ २०  मी नीतिमत्त्वाच्या मार्गाने चालते;मी न्यायाच्या वाटांवर मधोमध चालते. २१  माझ्यावर प्रेम करणाऱ्‍यांना मी समृद्ध वारसा देते,मी त्यांची कोठारं भरून टाकते. २२  यहोवाने आपल्या कार्यांची सुरुवात म्हणून मला उत्पन्‍न केलं.+ फार पूर्वीच्या त्याच्या अद्‌भुत कार्यांपैकी मी पहिली होते.+ २३  मला अगदी प्राचीन काळापासून, सुरुवातीपासून;+पृथ्वी अस्तित्वात येण्याच्याही आधीपासून स्थापन करण्यात आलं.+ २४  जेव्हा महासागर नव्हते;+ पाण्याने ओसंडून वाहणारे झरे नव्हते,तेव्हा मी जन्माला आले. २५  पर्वतांना आपल्या जागी स्थिर करण्यात आलंआणि डोंगर निर्माण करण्यात आले, त्याआधी मी जन्माला आले. २६  त्या वेळी, त्याने पृथ्वी आणि तिच्यावरची रानंवनं,किंवा जमिनीतल्या मातीची पहिली ढेकळंही निर्माण केली नव्हती. २७  त्याने आकाश तयार केलं,+ तेव्हा मी तिथे होते;जेव्हा त्याने पाण्यावर क्षितिजाची रेघ* ओढली;+ २८  जेव्हा त्याने आकाशात ढगांची स्थापना केली*आणि महासागरातले झरे उत्पन्‍न केले; २९  जेव्हा त्याने समुद्रासाठी सीमा घालून दिलीआणि त्याच्या लाटांनी ती पार करू नये, असा आदेश दिला;+जेव्हा त्याने पृथ्वीचे पाये स्थिर केले,* ३०  तेव्हा मी एका कुशल कारागिरासारखी त्याच्यासोबत होते.+ दिवसेंदिवस मी त्याला खूप प्रिय वाटू लागले.+ मी सतत त्याच्यासमोर आनंदी असायचे.+ ३१  त्याने मानवांसाठी बनवलेली पृथ्वी पाहून मला खूप आनंद झालाआणि मानवांबद्दल मला खूप जिव्हाळा होता. ३२  म्हणून, माझ्या मुलांनो, माझं ऐका;जे माझ्या मार्गांनी चालतात ते सुखी असतात. ३३  शिक्षणाकडे* लक्ष द्या+ आणि बुद्धिमान व्हा;त्याकडे कधीच दुर्लक्ष करू नका. ३४  जो माणूस दररोज पहाटे माझ्या दाराशी येऊन,*माझ्या उंबरठ्याजवळ थांबूनमाझं ऐकतो, तो सुखी आहे! ३५  कारण ज्याला मी सापडेन त्याला जीवन मिळेल,+आणि त्याच्यावर यहोवाची कृपा होईल. ३६  पण जो माझ्याकडे दुर्लक्ष करतो तो स्वतःचं* नुकसान करून घेतो,आणि जे माझा द्वेष करतात, ते मरण ओढवून घेतात.”*+

तळटीपा

किंवा “अनुभव नसलेल्यांनो.”
किंवा “वडिलोपार्जित शिकवण.”
शब्दशः “वर्तुळ.”
शब्दशः “दृढ केलं.”
किंवा “नेमले.”
नीत १:२ इथली तळटीप पाहा.
किंवा “जो माणूस दररोज जागं राहून.”
किंवा “आपल्या जिवाचं.”
किंवा “मरणावर प्रेम करतात.”