व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रश्‍न १८

तुम्ही देवासोबत जवळचं नातं कसं जोडू शकता?

“हे प्रार्थना ऐकणाऱ्‍या देवा, सर्व प्रकारचे लोक तुझ्याजवळ येतील.”

स्तोत्र ६५:२

“यहोवावर अगदी मनापासून भरवसा ठेव आणि स्वतःच्या समजशक्‍तीवर अवलंबून राहू नकोस. तुझ्या सर्व कार्यांत त्याची आठवण ठेव, म्हणजे तो तुझे मार्ग मोकळे करेल.”

नीतिवचनं ३:५, ६

“सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी त्यांनी एकाच खऱ्‍या देवाला, म्हणजे तुला आणि ज्याला तू पाठवलं त्या येशू ख्रिस्ताला ओळखणं गरजेचं आहे.”

योहान १७:३

“मुळात, देव आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही.”

प्रेषितांची कार्यं १७:२७

“मी सतत हीच प्रार्थना करतो, की तुमचं प्रेम दिवसेंदिवस आणखी वाढत राहावं आणि तुम्हाला सत्याचं अचूक ज्ञान आणि पूर्ण समज मिळावी.”

फिलिप्पैकर १:९

“तुमच्यापैकी कोणाला बुद्धीची गरज असली, तर त्याने ती देवाजवळ मागत राहावी म्हणजे त्याला ती दिली जाईल. कारण देव कोणालाही कमी न लेखता सगळ्यांना उदारपणे बुद्धी देतो.”

याकोब १:५

“देवाच्या जवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. अरे पापी लोकांनो, आपले हात स्वच्छ करा; अरे चंचल वृत्तीच्या लोकांनो, आपली मनं शुद्ध करा.”

याकोब ४:८

“देवावर प्रेम करण्याचा अर्थच असा आहे, की आपण त्याच्या आज्ञांचं पालन करावं आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत.”

१ योहान ५:३