व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रश्‍न १४

पैशांचा योग्य वापर कसा करावा?

“ज्याला मौजमजा करायला आवडतं, त्याच्यावर गरिबी येईल; ज्याला द्राक्षारसाचा आणि तेलाचा शौक आहे, तो श्रीमंत होणार नाही.”

नीतिवचनं २१:१७

“कर्ज घेणारा हा कर्ज देणाऱ्‍याचा गुलाम असतो.”

नीतिवचनं २२:७

“तुमच्यापैकी असा कोण आहे की ज्याला एक बुरूज बांधायचा असेल, तर तो आधी बसून खर्चाचा हिशोब लावणार नाही? आणि तो पूर्ण करायची आपली ऐपत आहे की नाही याची खातरी करणार नाही? नाहीतर पाया घातल्यावर त्याला बांधकाम पूर्ण करता येणार नाही आणि लोक त्याची थट्टा करू लागतील. ते म्हणतील: ‘या माणसाने बांधकाम तर सुरू केलं, पण याला ते पूर्ण करता आलं नाही.’”

लूक १४:२८-३०

“तेव्हा सगळे पोटभर जेवल्यावर तो त्याच्या शिष्यांना म्हणाला: ‘काहीही वाया जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा.’”

योहान ६:१२