व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रश्‍न १

देव कोण आहे?

“लोकांना कळू दे, की तुझं नाव यहोवा आहे आणि या संपूर्ण पृथ्वीवर फक्‍त तूच सर्वोच्च देव आहेस.”

स्तोत्र ८३:१८

“यहोवाच देव आहे हे ओळखा. त्यानेच आपल्याला बनवलं आणि आपण त्याचेच आहोत.”

स्तोत्र १००:३

“मी यहोवा आहे. हे माझं नाव आहे; दुसऱ्‍या कोणालाही मी माझा गौरव मिळू देणार नाही, माझी प्रशंसा मी मूर्तींना मिळू देणार नाही.”

यशया ४२:८

“जो कोणी यहोवाचं नाव घेऊन त्याला हाक मारेल, त्याला वाचवलं जाईल.”

रोमकर १०:१३

“अर्थात, प्रत्येक घर कोणी ना कोणी बांधलेलं असतं. पण ज्याने सर्व गोष्टी निर्माण केल्या तो देव आहे.”

इब्री लोकांना ३:४

“आपले डोळे वर करा आणि आकाशाकडे बघा. या सगळ्या ताऱ्‍यांना कोणी बनवलं? जो त्यांच्या सैन्याची मोजणी करून त्यांचं नेतृत्व करतो; त्यांच्यातल्या प्रत्येकाला जो नावाने बोलावतो, त्यानेच त्यांना बनवलं आहे. त्याच्या प्रचंड आणि अफाट शक्‍तीमुळे, त्याच्या विस्मयकारक ताकदीमुळे, त्यांच्यातला एकही गैरहजर राहत नाही.”

यशया ४०:२६