नीतिवचनं २६:१-२८

  • आळशी माणसाचं वर्णन (१३-१६)

  • दुसऱ्‍यांच्या भांडणात पडू नका (१७)

  • दुसऱ्‍यांचं नुकसान होईल अशी मस्करी करू नका (१८, १९)

  • लाकूड नाही तर आगही नाही (२०, २१)

  • बदनामी करणाऱ्‍याचे शब्द चविष्ट घासांसारखे (२२)

२६  उन्हाळ्यात बर्फवृष्टी आणि कापणीच्या वेळी पाऊस,तसा मूर्खाला सन्मान शोभत नाही.+  २  पक्षी निसटून जाण्यामागे आणि पाकोळी उडून जाण्यामागे काहीतरी कारण असतं,तसंच कोणताही शाप विनाकारण लागत नाही.*  ३  घोड्यासाठी चाबूक आणि गाढवासाठी लगाम,+तशीच मूर्खांच्या पाठीसाठी काठी असते.+  ४  मूर्खाला त्याच्या मूर्खतेप्रमाणे उत्तर देऊ नकोस,नाहीतर तुझ्यात आणि त्याच्यात काय फरक राहील?*  ५  मूर्खाला त्याच्या मूर्खतेप्रमाणेच उत्तर दे,नाहीतर तो स्वतःला बुद्धिमान समजेल.+  ६  जो मूर्खावर कामं सोपवतो,तो स्वतःचे पाय कापून टाकणाऱ्‍या आणि स्वतःचं नुकसान करणाऱ्‍या* माणसासारखा असतो.  ७  मूर्ख लोकांच्या तोंडी बोधवाक्य,*लंगड्या माणसाच्या लुळ्या* पायांसारखं असतं.+  ८  मूर्खाचा गौरव करणंगोफणीला दगड बांधून ठेवण्यासारखं असतं.+  ९  मूर्खांच्या तोंडी बोधवाक्य*म्हणजे दारुड्याच्या हाती आलेलं काटेरी झुडूप. १०  जो मूर्खाला किंवा कोणत्याही येणाऱ्‍या-जाणाऱ्‍याला कामावर ठेवून घेतो,तो नेम न धरता सर्वांना जखमी करणाऱ्‍या तिरंदाजासारखा असतो. ११  पुन्हापुन्हा तोच मूर्खपणा करणारा मूर्ख,आपल्या ओकारीकडे परत जाणाऱ्‍या कुत्र्यासारखा असतो.+ १२  स्वतःला बुद्धिमान समजणारा माणूस तू पाहिला आहेस का?+ त्याच्यापेक्षा एखाद्या मूर्खाला जास्त आशा आहे. १३  आळशी म्हणतो: “रस्त्यावर सिंहाचा छावा आहे,चौकात सिंह आहे!”+ १४  जसा दरवाजा बिजागऱ्‍यांवर फिरत राहतो,तसा आळशी माणूस अंथरुणावर लोळत राहतो.+ १५  आळशी माणूस मेजवानीच्या ताटात हात तर घालतो,पण तो तोंडाजवळ नेण्याचीही ताकद त्याच्यात नसते.+ १६  आळशी माणूस स्वतःला,विचारपूर्वक उत्तर देणाऱ्‍या सात लोकांपेक्षा हुशार* समजतो. १७  जो रस्त्याने जाताना दुसऱ्‍याच्या भांडणात पडून संतापतो,*तो एखाद्या कुत्र्याचे कान ओढणाऱ्‍यासारखा असतो.+ १८  एखाद्या वेड्या माणसाने जळते बाण सोडावेत किंवा जीवघेणे भाले फेकावेत, १९  तसा एखादा माणूस आपल्या शेजाऱ्‍याची फसवणूक करून, “मी तर फक्‍त चेष्टा करत होतो” असं म्हणतो.+ २०  लाकूड नसलं, तर आग विझून जाते,तसंच, बदनामी करणारा नसला की भांडण आपोआप मिटतं.+ २१  जसं आगीसाठी लाकूड आणि निखाऱ्‍यांसाठी कोळसा लागतो,तशी भांडखोर माणसामुळे भांडणं पेटतात.+ २२  बदनामी करणाऱ्‍याचे शब्द जणू चविष्ट पदार्थाचे घास* असतात,ते गिळल्यावर सरळ पोटात जातात.+ २३  दुष्ट मनाच्या माणसाचे प्रेमळ शब्द,*मडक्याच्या खापरीवर चांदीच्या मुलाम्यासारखे असतात.+ २४  दुसऱ्‍यांचा द्वेष करणारा वरवर गोड बोलतो,पण त्याच्या मनात कपट असतं. २५  तो प्रेमळपणे बोलला तरी त्याच्यावर भरवसा ठेवू नकोस,कारण त्याच्या मनात सात घृणास्पद गोष्टी आहेत.* २६  त्याने कपटीपणे आपला द्वेष लपवला,तरी त्याचा वाईटपणा सर्वांसमोर उघडा पडेल. २७  जो खड्डा खोदतो, तो स्वतःच त्याच्यात पडेलआणि जो धोंडा बाजूला लोटतो, त्याच्यावरच तो उलटेल.+ २८  खोटं बोलणारा, त्याने चिरडलेल्यांचा द्वेष करतोआणि खोटी स्तुती करणारा नाशाला कारण होतो.+

तळटीपा

किंवा कदाचित, “विनाकारण दिलेला शाप खरा ठरत नाही.”
किंवा “नाहीतर तूही त्याच्या पातळीवर येशील.”
शब्दशः “हिंसा पिणाऱ्‍या.”
किंवा “नीतिवचन.”
किंवा “लटकणाऱ्‍या.”
किंवा “नीतिवचन.”
किंवा “बुद्धिमान.”
किंवा कदाचित, “नाक खुपसतो.”
किंवा “हावरटपणे गिळल्या जाणाऱ्‍या गोष्टी.”
शब्दशः “उत्सुक ओठ.”
किंवा “कारण त्याचं मन पूर्णपणे घृणास्पद आहे.”