व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रश्‍न ९

आपल्या जीवनात दुःख का येतं?

“जे वेगवान असतात, ते नेहमीच शर्यत जिंकत नाहीत; जे शक्‍तिशाली असतात, ते नेहमीच युद्ध जिंकत नाहीत; जे बुद्धिमान असतात, त्यांना नेहमीच अन्‍न मिळत नाही; जे हुशार असतात, त्यांना नेहमीच संपत्ती लाभत नाही आणि जे ज्ञानी असतात, त्यांना नेहमीच यश मिळत नाही, कारण वेळ आणि अनपेक्षित घटना त्या सर्वांसोबत घडतात.”

उपदेशक ९:११

“एका माणसाद्वारे पाप जगात आलं आणि पापाद्वारे मरण आलं आणि अशा रितीने सर्व माणसांमध्ये मरण पसरलं, कारण त्या सगळ्यांनी पाप केलं होतं.”

रोमकर ५:१२

“देवाचा मुलगा यासाठीच आला, की त्याने सैतानाची कार्यं उद्ध्‌वस्त करावीत.”

१ योहान ३:८

“सगळं जग सैतानाच्या नियंत्रणात आहे.”

१ योहान ५:१९