व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रश्‍न १७

बायबलमुळे तुमच्या कुटुंबाला कसा फायदा होऊ शकतो?

पती/पिता

“त्याचप्रमाणे, पती जसा स्वतःच्या शरीरावर प्रेम करतो तसंच त्याने आपल्या पत्नीवरही प्रेम करावं. जो माणूस आपल्या पत्नीवर प्रेम करतो तो स्वतःवर प्रेम करतो. कारण कोणताही माणूस स्वतःच्या शरीराचा द्वेष करत नाही. उलट, तो त्याचं पालनपोषण करतो, . . . तुमच्यापैकी प्रत्येक जण जसं स्वतःवर प्रेम करतो, तसंच त्याने आपल्या पत्नीवरही प्रेम करावं.”

इफिसकर ५:२८, २९, ३३

“वडिलांनो, आपल्या मुलांना चीड आणू नका, तर त्यांना यहोवाच्या शिस्तीत आणि शिक्षणात वाढवत राहा.”

इफिसकर ६:४

पत्नी

“पत्नीने आपल्या पतीचा मनापासून आदर करावा.”

इफिसकर ५:३३

“पत्नींनो, आपल्या पतींच्या अधीन राहा, कारण असं करणं प्रभूमध्ये योग्य आहे.”

कलस्सैकर ३:१८

मुलं

“मुलांनो, देवाच्या इच्छेप्रमाणे आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहा, कारण असं करणं योग्य आहे. ‘आपल्या वडिलांचा आणि आईचा आदर करा,’ ही पहिली आज्ञा आहे. तिच्यासोबत असं अभिवचन देण्यात आलं आहे: ‘म्हणजे तुमचं भलं होईल आणि तुम्हाला पृथ्वीवर दीर्घायुष्य लाभेल.’”

इफिसकर ६:१-३

“मुलांनो, सगळ्या बाबतींत आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहा, कारण यामुळे प्रभूला आनंद होतो.”

कलस्सैकर ३:२०