व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रश्‍न २०

बायबल वाचताना पुरेपूर फायदा होण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

बायबल वाचताना या प्रश्‍नांवर विचार करा:

यातून मला यहोवा देवाबद्दल काय शिकायला मिळतं?

या भागाचा बायबलच्या मुख्य संदेशाशी काय संबंध आहे?

मला या माहितीचा माझ्या जीवनात कसा उपयोग करता येईल?

दुसऱ्‍यांना मदत करायला मला या वचनांचा कसा उपयोग करता येईल?

“तुझे शब्द माझ्या पायांसाठी दिव्यासारखे, आणि माझ्या मार्गासाठी प्रकाशासारखे आहेत!”

स्तोत्र ११९:१०५