नीतिवचनं १०:१-३२

  • बुद्धिमान मुलगा आपल्या वडिलांना खूश करतो ()

  • मेहनती हातांमुळे संपत्ती मिळते ()

  • जितके जास्त शब्द, तितक्याच जास्त चुका (१९)

  • यहोवाच्या आशीर्वादाने माणूस श्रीमंत होतो (२२)

  • यहोवाची भीती बाळगल्यामुळे आयुष्य वाढतं (२७)

१०  शलमोनची नीतिवचनं.+ बुद्धिमान मुलगा आपल्या वडिलांना खूश करतो,+पण मूर्ख मुलगा आपल्या आईला दुःख देतो.  २  दुष्टपणाने मिळवलेल्या संपत्तीचाकाहीच उपयोग होणार नाही,पण नीतिमत्त्वामुळे मृत्यूपासून सुटका होते.+  ३  यहोवा नीतिमानाला अन्‍न देऊन तृप्त करेल,+पण तो दुष्टाची इच्छा पूर्ण होऊ देणार नाही.  ४  आळशी हातांमुळे गरिबी येते,+पण मेहनती हातांमुळे संपत्ती मिळते.+  ५  सखोल समज असलेला मुलगा उन्हाळ्यात पीक गोळा करतो,पण निर्लज्जपणे वागणारा मुलगा कापणीच्या काळात गाढ झोपेत असतो.+  ६  नीतिमानाला आशीर्वाद मिळतात,+पण दुष्ट आपल्या मनातल्या हिंसक कल्पना लपवून ठेवतो.  ७  नीतिमानाला लोक आठवणीत ठेवतील* आणि आशीर्वाद देतील,+पण दुष्टाचं नाव कुजून जाईल.+  ८  जो बुद्धिमान मनाचा असतो तो सल्ला* स्वीकारतो,+पण मूर्खपणे बोलणाऱ्‍याला तुडवलं जाईल.+  ९  खरेपणाने चालणारा सुरक्षितपणे चालेल,+पण वाकड्या मार्गांनी चालणारा पकडला जाईल.+ १०  कपटीपणे डोळे मिचकावणारा दुःख देतो+आणि मूर्खपणे बोलणाऱ्‍याला तुडवलं जाईल.+ ११  नीतिमानाचं तोंड म्हणजे जीवनाचा झरा,+पण दुष्ट आपल्या मनातल्या हिंसक कल्पना लपवतो.+ १२  द्वेषामुळे भांडणांना तोंड फुटतं,पण प्रेम सर्व अपराधांना झाकतं.+ १३  समंजस माणसाच्या ओठांवर बुद्धीच्या गोष्टी असतात,+पण ज्याला समज नसते त्याच्या पाठीला काठीचा मार मिळतो.+ १४  जे बुद्धिमान असतात, ते ज्ञान साठवतात+पण मूर्ख आपल्या तोंडाने नाश ओढवतो.+ १५  श्रीमंताची संपत्ती* त्याच्यासाठी तटबंदी शहरासारखी असते. पण गरिबाची गरिबी त्याचा नाश करते.+ १६  नीतिमानाची कामं जीवन देणारी असतात;पण दुष्टाची मिळकत त्याला पाप करायला लावते.+ १७  जो शिक्षणाकडे लक्ष देतो तो इतरांना जीवनाचा मार्ग दाखवतो,*पण जो ताडनाकडे दुर्लक्ष करतो, तो इतरांना भरकटायला लावतो. १८  जो आपला द्वेष लपवतो तो खोटं बोलतो+आणि जो बदनामी करणाऱ्‍या गोष्टी* पसरवतो, तो मूर्ख असतो. १९  जितके जास्त शब्द, तितक्याच जास्त चुका,+पण जिभेवर ताबा ठेवणारा शहाणपणाने वागतो.+ २०  नीतिमानाची जीभ उत्कृष्ट चांदीसारखी असते,+पण दुष्टाचं हृदय कवडीमोल असतं. २१  नीतिमानाचे बोल बऱ्‍याच लोकांचं पोषण* करतात,+पण मूर्ख लोक समज नसल्यामुळे मरतात.+ २२  यहोवाच्या आशीर्वादानेच माणूस श्रीमंत होतो+आणि तो त्यासोबत दुःख देत नाही. २३  मूर्खाला लाजिरवाण्या गोष्टी करणं खेळ वाटतो,पण समंजस माणसाकडे बुद्धी असते.+ २४  दुष्टाला ज्या संकटाची भीती वाटते तेच त्याच्यावर येईल;पण नीतिमानाची इच्छा पूर्ण केली जाईल.+ २५  वादळ सरल्यावर, दुष्ट नाहीसा झालेला असेल,+पण नीतिमान हा कायम टिकणारा पाया असतो.+ २६  शिरक्यामुळे* दातांना आणि धुरामुळे डोळ्यांना,तसा आळशी माणसामुळे त्याच्या मालकाला* त्रास होतो. २७  यहोवाची भीती बाळगल्यामुळे आयुष्य वाढतं,+पण दुष्टाच्या आयुष्याची वर्षं कमी केली जातील.+ २८  नीतिमानाची आशा* आनंददायक असते,+पण दुष्टाची आशा धुळीला मिळेल.+ २९  यहोवाचा मार्ग निर्दोष माणसासाठी बुरुजासारखा असतो,+पण तो मार्ग दुष्टांवर विनाश आणतो.+ ३०  नीतिमान कधीच डळमळणार नाही,+पण दुष्ट पृथ्वीवरून नाहीसे होतील.+ ३१  नीतिमानाच्या तोंडून बुद्धीच्या गोष्टी निघतात,*पण खोटं बोलणारी जीभ कापून टाकली जाईल. ३२  नीतिमानाच्या शब्दांमुळे त्याच्यावर कृपा होईल,पण दुष्टाच्या तोंडून कपटीपणाच्या गोष्टी निघतात.

तळटीपा

किंवा “लोक नीतिमानाचं नाव घेतील.”
शब्दशः “आज्ञा.”
किंवा “मौल्यवान वस्तू.”
किंवा कदाचित, “तो जीवनाच्या मार्गावर आहे.”
किंवा “अफवा.”
किंवा “मार्गदर्शन.”
एक आंबट द्रव. इंग्रजीत विनेगर.
किंवा “त्याला पाठवणाऱ्‍याला.”
किंवा “अपेक्षा.”
किंवा “बुद्धीचं फळ उत्पन्‍न होतं.”