व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रश्‍न १६

तुम्ही चिंतांचा सामना कसा करू शकता?

“तुझं सगळं ओझं यहोवावर टाकून दे, म्हणजे तो तुला सांभाळेल. नीतिमान माणसाला तो कधीच पडू देणार नाही.”

स्तोत्र ५५:२२

“मेहनत करणाऱ्‍यांच्या योजना नक्कीच यशस्वी होतात, पण जे उतावीळपणे वागतात त्यांच्यावर गरिबी आल्याशिवाय राहत नाही.”

नीतिवचनं २१:५

“भिऊ नकोस, मी तुझ्यासोबत आहे. घाबरू नकोस, मी तुझा देव आहे. मी तुला बळ देईन; हो, मी तुला मदत करीन. नीतिमत्त्वाच्या माझ्या उजव्या हाताने मी तुला आधार देईन.’”

यशया ४१:१०

“चिंता करून कोणी आपलं आयुष्य हातभर वाढवू शकतं का?”

मत्तय ६:२७

“त्यामुळे, उद्याची चिंता कधीही करू नका, कारण उद्याचा दिवस नव्या चिंता घेऊन उगवेल. ज्या दिवसाची चिंता त्या दिवसाला पुरे.”

मत्तय ६:३४

“कोणत्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत याची तुम्ही नेहमी खातरी करून घ्यावी.”

फिलिप्पैकर १:१०

“कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका. तर, सगळ्या गोष्टींत देवाचे आभार मानून प्रार्थना आणि याचना करा आणि आपल्या विनंत्या देवाला कळवा. म्हणजे, सर्व समजशक्‍तीच्या पलीकडे असलेली देवाची शांती ख्रिस्त येशूद्वारे तुमच्या मनाचं आणि बुद्धीचं रक्षण करेल.”

फिलिप्पैकर ४:६, ७