व्हिडिओ पाहण्यासाठी

येशूच्या मृत्यूचा स्मारकविधी

शनिवार, १२ एप्रिल २०२५

यहोवाचे साक्षीदार वर्षातून एकदा येशूच्या मृत्यूचा स्मारकविधी पाळतात. हा विधी पाळावा अशी आज्ञा येशूनेच त्याच्या शिष्यांना दिली होती. त्याने म्हटलं होतं: “माझी आठवण म्हणून हे करत राहा.”—लूक २२:१९.

आम्ही तुम्हाला या कार्यक्रमाचं आमंत्रण देतोय.

सहसा विचारले जाणारे प्रश्‍न

हा कार्यक्रम किती वेळ चालेल?

जवळपास एक तास.

हा कार्यक्रम कुठे होईल?

तुमच्या जवळच्या ठिकाणी हा कार्यक्रम कुठे असणार आहे हे माहीत करून घेण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांना संपर्क करा.

प्रवेश फी आहे का?

नाही.

वर्गणी गोळा केली जाईल का?

नाही. यहोवाचे साक्षीदार त्यांच्या सभांमध्ये कधीच वर्गणी गोळा करत नाहीत.

तिथे विशिष्ट प्रकारचे कपडे घालून यायचंय का?

या कार्यक्रमासाठी विशिष्ट प्रकारचे कपडे घालायची गरज नाही. पण यहोवाचे साक्षीदार बायबलमध्ये दिलेला सल्ला पाळण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतात. त्यात म्हटलंय की आपले कपडे सभ्य आणि शालीन असले पाहिजेत. (१ तीमथ्य २:९) तुमचे कपडे महागडे असण्याची गरज नाही.

स्मारकविधीच्या कार्यक्रमात काय होणार आहे?

कार्यक्रमाच्या सुरुवातीला गीत गायलं जाईल आणि नंतर यहोवाचा एक साक्षीदार येऊन प्रार्थना करेल. मग एक भाषण होईल ज्यात सांगितलं जाईल, की येशूने आपलं जीवन बलिदान म्हणून का दिलं. तसंच, देवाने आणि ख्रिस्ताने आपल्यासाठी जे केलं आहे, त्याचा आपल्याला कसा फायदा होऊ शकतो. कार्यक्रमाचा शेवट एका गीताने आणि प्रार्थनेने केला जाईल.

येणाऱ्‍या वर्षांमध्ये स्मारकविधी कधी साजरा केला जाणार आहे?

२०२५: शनिवार, १२ एप्रिल

२०२६: गुरूवार, २ एप्रिल