व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रश्‍न १५

तुम्ही खरा आनंद कसा मिळवू शकता?

“जिथे द्वेष आहे तिथे मेजवानी करण्यापेक्षा, प्रेम असलेल्या घरातलं साधं जेवण बरं.”

नीतिवचनं १५:१७

“मी यहोवा तुझा देव आहे. मी तुला तुझ्या भल्यासाठी शिकवतो, आणि ज्या मार्गाने तू चाललं पाहिजेस, त्यावरून मी तुला नेतो.”

यशया ४८:१७

“ज्यांना देवाच्या मार्गदर्शनाची भूक आहे ते सुखी आहेत, कारण स्वर्गाचं राज्य अशाच लोकांचं आहे.”

मत्तय ५:३

“तू आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखंच प्रेम कर.”

मत्तय २२:३९

“लोकांनी तुमच्याशी जसं वागावं असं तुम्हाला वाटतं तसंच तुम्हीही त्यांच्याशी वागा.”

लूक ६:३१

“जे देवाचं वचन ऐकून त्याप्रमाणे वागतात तेच सुखी!”

लूक ११:२८

“एखाद्याकडे भरपूर संपत्ती असली, तरी ती त्याला जीवन देऊ शकत नाही.”

लूक १२:१५

“त्यामुळे, आपल्याजवळ खायला अन्‍न आणि घालायला कपडे असतील, तर आपण त्यांत समाधानी राहू या.”

१ तीमथ्य ६:८

“घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद आहे.”

प्रेषितांची कार्यं २०:३५