व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रश्‍न ७

आपल्या काळाबद्दल बायबलमध्ये काय सांगितलं होतं?

“एका राष्ट्रावर दुसरं राष्ट्र आणि एका राज्यावर दुसरं राज्य हल्ला करेल . . . या सगळ्या गोष्टी संकटांची फक्‍त सुरुवात असेल.”

मत्तय २४:७, ८

“पुष्कळ खोटे संदेष्टे उठून बऱ्‍याच जणांना फसवतील. आणि अनीती वाढल्यामुळे पुष्कळांचं प्रेम थंड होईल.”

मत्तय २४:११, १२

“जेव्हा तुम्ही लढायांचा आवाज आणि लढायांच्या बातम्या ऐकाल तेव्हा घाबरून जाऊ नका. या गोष्टी घडणं आवश्‍यक आहे, पण इतक्यात अंत येणार नाही.”

मार्क १३:७

“मोठमोठे भूकंप होतील आणि ठिकठिकाणी दुष्काळ आणि रोगांच्या साथी येतील. तसंच, भयानक दृश्‍यं आणि आकाशात मोठी चिन्हं दिसतील.”

लूक २१:११

“शेवटच्या दिवसांत खूप कठीण काळ येईल हे लक्षात ठेव. कारण, लोक फक्‍त स्वतःवर प्रेम करणारे, पैशावर प्रेम करणारे, बढाई मारणारे, गर्विष्ठ, निंदा करणारे, आईवडिलांचं न ऐकणारे, उपकारांची जाण न ठेवणारे, बेइमान, माया-ममता नसलेले, कोणत्याही गोष्टीशी सहमत न होणारे, इतरांची बदनामी करणारे, संयम नसलेले, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम नसलेले, विश्‍वासघात करणारे, अडेल वृत्तीचे, गर्वाने फुगलेले, देवापेक्षा चैनीची आवड असलेले, देवाची भक्‍ती करायचा फक्‍त दिखावा करून आपल्या जीवनावर तिचा प्रभाव न होऊ देणारे असे असतील.”

२ तीमथ्य ३:⁠१-⁠५