व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रश्‍न ११

मृत्यू झाल्यावर माणसाचं काय होतं?

“त्याचा श्‍वास निघून जातो, तो मातीला मिळतो; त्याच दिवशी त्याच्या विचारांचा शेवट होतो.”

स्तोत्र १४६:४

“आपण मरणार हे जिवंतांना माहीत असतं, पण मेलेल्यांना तर काहीच माहीत नसतं; . . . तुझ्या हातांना जे काही काम मिळेल, ते मन लावून कर. कारण ज्या कबरेकडे तू जात आहेस, तिथे कोणतंही काम, योजना, ज्ञान किंवा बुद्धी नाही.”

उपदेशक ९:५, १०

“[येशू] म्हणाला: ‘आपला मित्र लाजर झोपलाय. पण मी त्याला उठवायला तिथे जातोय.’ खरंतर येशू त्याच्या मरणाबद्दल बोलला होता. पण त्यांना वाटलं, की तो विश्रांतीसाठी झोप घेण्याबद्दल बोलत आहे. तेव्हा येशू स्पष्टपणे म्हणाला: ‘लाजर मेलाय.’”

योहान ११:११, १३, १४