नीतिवचनं २४:१-३४
२४ दुष्ट माणसांचा हेवा करू नकोसआणि त्यांच्या संगतीची इच्छा धरू नकोस.+
२ कारण त्यांच्या मनात हिंसा करण्याचे विचार घोळत असतातआणि ते नेहमी दुसऱ्यांची हानी करण्याच्या गोष्टी करतात.
३ घर* बुद्धीने बांधलं जातं+आणि समंजसपणाने ते सुरक्षित राहतं.
४ ज्ञानामुळे त्याच्या खोल्या मौल्यवानआणि सुंदर वस्तूंनी भरतात.+
५ बुद्धिमान माणसाजवळ ताकद असते+आणि ज्ञानाने माणूस आपली शक्ती वाढवतो.
६ कुशल* मार्गदर्शनाने लढाई लढ;+पुष्कळ जणांच्या सल्ल्यामुळे विजय* मिळतो.+
७ खरी बुद्धी मूर्खाच्या आवाक्याबाहेर असते;+शहराच्या फाटकाजवळ त्याच्याकडे बोलण्यासारखं काहीही नसतं.
८ दुष्ट योजना करणाऱ्यालालोक कारस्थानी म्हणतील.+
९ मूर्खपणाच्या* योजना पाप करायला लावतातआणि थट्टा करणाऱ्याची लोकांना चीड येते.+
१० दुःखाच्या प्रसंगी* तू निराश झालास,तर तुझी शक्ती कमी पडेल.
११ ज्यांना ठार मारायला नेलं जातंय, त्यांना सोडवआणि ज्यांची कत्तल होणार आहे, त्यांना वाचवायचा प्रयत्न कर.+
१२ “पण आम्हाला याबद्दल माहीतच नव्हतं,” असं जर तुम्ही म्हणालात,तर हृदयांचं* परीक्षण करणारा ते ओळखणार नाही का?+
हो, तुमच्यावर* लक्ष ठेवणाऱ्या देवाला ते कळेलआणि तो प्रत्येक माणसाला त्याच्या कामांप्रमाणे फळ देईल.+
१३ माझ्या मुला, मध खा कारण तो चांगला असतो;पोळ्यातला मध गोड असतो.
१४ त्याचप्रमाणे, बुद्धीही तुझ्यासाठी चांगली आहे* हे विसरू नकोस.+
तुला ती सापडली, तर तुझं भविष्य उज्ज्वल होईलआणि तुझी आशा नाहीशी होणार नाही.+
१५ नीतिमान माणसाच्या घराजवळ दुष्ट इराद्याने टपून बसू नकोस;त्याच्या विश्रांतीचं ठिकाण उद्ध्वस्त करू नकोस.
१६ कारण नीतिमान सात वेळा जरी पडला, तरी तो पुन्हा उठेल,+पण दुष्टावर संकट येताच तो खाली पडेल.+
१७ तुझा शत्रू पडला तर आनंदी होऊ नकोस;तो अडखळला तर मनातल्या मनात खूश होऊ नकोस.+
१८ नाहीतर, यहोवा हे बघेल तेव्हा त्याला ते आवडणार नाहीआणि तुझ्या शत्रूवरचा त्याचा राग शांत होईल.+
१९ वाईट कामं करणाऱ्यांमुळे चिडू* नकोसआणि दुष्टांचा हेवा करू नकोस.
२० कारण वाईट माणसाचं भविष्य अंधकारमय असतं;+दुष्टांचा दिवा विझून जाईल.+
२१ माझ्या मुला, यहोवाची आणि राजाची भीती बाळग.+
विद्रोह करणाऱ्यांची* संगत धरू नकोस.+
२२ कारण त्यांच्यावर अचानक संकट येईल.+
दोघं* त्यांच्यावर कोणती विपत्ती आणतील, हे कोण सांगू शकतं?+
२३ बुद्धिमानांनी असंही म्हटलेलं आहे:
न्याय करताना पक्षपात करणं योग्य नाही.+
२४ जो दुष्टाला, “तू नीतिमान आहेस,” असं म्हणतो,+त्याला लोक शाप देतील आणि राष्ट्रं त्याचा तिरस्कार करतील.
२५ पण जे त्याला ताडन करतात त्यांचं भलं होईल;+त्यांच्यावर कृपेचा आणि आशीर्वादांचा वर्षाव होईल.+
२६ प्रामाणिकपणे उत्तर देणाऱ्याचा लोक आदर करतील.*+
२७ आधी तुझी बाहेरची आणि शेतातली कामं कर;मग तुझं घर* बांध.
२८ पुरावा नसताना आपल्या शेजाऱ्याविरुद्ध साक्ष देऊ नकोस.+
आपल्या शब्दांनी इतरांची फसवणूक करू नकोस.+
२९ “त्याने माझ्यासोबत केलं, तसंच मीही करीन;त्याने जे केलं त्याचा मी बदला घेईन,” असं म्हणू नकोस.+
३० मी आळशी माणसाच्या शेताजवळून;+समज नसलेल्या माणसाच्या द्राक्षमळ्याजवळून गेलो.
३१ तेव्हा मला त्यात सगळीकडे जंगली झुडपं उगवलेली दिसली;जमीन काट्याकुसळ्यांनी भरली होतीआणि त्याची दगडी भिंत पडली होती.+
३२ हे पाहून मी त्यावर विचार केलाआणि त्यातून हा धडा घेतला:
३३ जराशी डुलकी घेतो, जराशी झोप घेतो,हात छातीशी घेऊन अजून थोडासा आराम करतो,
३४ असं म्हणत राहिलास, तर गरिबी एखाद्या लुटारूप्रमाणेआणि दारिद्र्य एखाद्या शस्त्रधारी माणसाप्रमाणे तुला गाठेल.+
तळटीपा
^ किंवा “कुटुंब.”
^ किंवा “सुज्ञ.”
^ किंवा “यश; तारण.”
^ किंवा “मूर्खाच्या.”
^ किंवा “संकटाच्या काळात.”
^ किंवा “हेतूंचं.”
^ किंवा “तुमच्या जिवावर.”
^ किंवा “तुझ्या जिवासाठी गोड आहे.”
^ किंवा “संतापू.”
^ किंवा “बदल घडवू पाहणाऱ्यांची.”
^ म्हणजे, यहोवा आणि राजा.
^ शब्दशः “ओठांचं चुंबन घेतील.” किंवा कदाचित, “सरळ उत्तर देणं चुंबन घेण्यासारखं आहे.”
^ किंवा “कुटुंब.”