व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रश्‍न १२

ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्यासाठी कोणती आशा आहे?

“हे ऐकून आश्‍चर्य करू नका, कारण अशी वेळ येत आहे जेव्हा स्मारक कबरींमध्ये असलेले सगळे त्याची हाक ऐकतील आणि बाहेर येतील.”

योहान ५:२८, २९

“नीतिमान आणि अनीतिमान अशा सगळ्या लोकांना मेलेल्यांतून उठवलं जाणार आहे.”

प्रेषितांची कार्यं २४:१५

“मरण पावलेले लहानमोठे राजासनासमोर उभे असलेले मला दिसले आणि गुंडाळ्या उघडण्यात आल्या. पण, आणखी एक गुंडाळी उघडण्यात आली; ती जीवनाची गुंडाळी आहे. गुंडाळ्यांमध्ये ज्या गोष्टी लिहिण्यात आल्या होत्या त्यांवरून मेलेल्यांचा, त्यांच्या कृत्यांप्रमाणे न्याय करण्यात आला. आणि समुद्राने त्याच्यातल्या मेलेल्यांना बाहेर सोडलं. तसंच, मृत्यूने आणि कबरेनेसुद्धा त्यांच्यातल्या मेलेल्यांना बाहेर सोडलं आणि ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे त्यांचा न्याय करण्यात आला.”

प्रकटीकरण २०:१२, १३