व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रश्‍न ८

आपल्या दुःखांसाठी देव जबाबदार आहे का?

“देव कधीच दुष्टपणे वागू शकत नाही, आणि सर्वशक्‍तिमान देव चूक करेल, हे शक्य नाही.”

ईयोब ३४:१०

“संकट येतं, तेव्हा ‘देव माझी परीक्षा घेतोय,’ असं कोणी म्हणू नये. कारण कोणीही वाईट गोष्टींनी देवाची परीक्षा घेऊ शकत नाही आणि तोसुद्धा वाईट गोष्टींनी कोणाची परीक्षा घेत नाही.”

याकोब १:१३

“आपल्या सगळ्या चिंता त्याच्यावर टाकून द्या, कारण त्याला तुमची काळजी आहे.”

१ पेत्र ५:७

“काहींना वाटतं की यहोवा आपलं अभिवचन पूर्ण करण्याच्या बाबतीत उशीर करत आहे, पण तसं नाही. उलट तो तुमच्या बाबतीत सहनशीलता दाखवतो. कारण कोणाचाही नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सगळ्यांनी पश्‍चात्ताप करावा असं त्याला वाटतं.”

२ पेत्र ३:९