पेत्र याचं पहिलं पत्र ३:१-२२

  • पतीपत्नी (१-७)

  • सहानुभूती दाखवा; शांती टिकवून ठेवा (८-१२)

  • नीतिमत्त्वासाठी दुःख सोसणं (१३-२२)

    • आपल्या आशेबद्दल उत्तर द्यायला तयार असा (१५)

    • बाप्तिस्मा आणि शुद्ध विवेक (२१)

 त्याच प्रकारे पत्नींनो, तुम्हीसुद्धा आपल्या पतींच्या अधीन राहा.+ म्हणजे जरी एखादा पती वचनाचं पालन करणारा नसला, तरी त्याने एकाही शब्दाशिवाय फक्‍त आपल्या पत्नीच्या वागणुकीमुळे,+ २  म्हणजेच, तिचं शुद्ध आचरण+ आणि ती मनापासून दाखवत असलेला आदर पाहून विश्‍वासात यावं. ३  बाहेरून दिसणाऱ्‍या गोष्टींनी, म्हणजेच खास प्रकारच्या केशरचना करून,* तसंच सोन्याचे दागिने+ किंवा महागडे कपडे घालून आपलं सौंदर्य वाढवायचा प्रयत्न करू नका. ४  तर आपल्या मनातल्या गुप्त व्यक्‍तीला शांत वृत्ती आणि सौम्यता यांसारख्या गुणांनी सजवा.+ हे सौंदर्य कधीच नष्ट होत नाही आणि ते देवाच्या नजरेत फार मौल्यवान आहे. ५  कारण जुन्या काळात देवावर आशा ठेवणाऱ्‍या पवित्र स्त्रिया, आपल्या पतींच्या अधीन राहून स्वतःला असंच सजवत होत्या. ६  जसं की, सारा ही अब्राहामच्या आज्ञेत राहिली आणि ती त्याला प्रभू म्हणायची.+ तुम्हीसुद्धा चांगलं करत राहिला आणि भीतीला बळी पडला नाहीत,+ तर तुम्हीही तिच्या मुली बनू शकता. ७  त्याच प्रकारे, पतींनो आपल्या पत्नींसोबत विचारशीलपणे राहा.* त्या स्त्रिया असल्यामुळे, जास्त नाजूक भांड्यांसारख्या आहेत हे ओळखून त्यांना मान द्या,+ नाहीतर तुमच्या प्रार्थना ऐकल्या जाणार नाहीत. कारण, तुमच्यासोबत त्यासुद्धा देवाच्या अपार कृपेने मिळणार असलेल्या जीवनाच्या वारस आहेत.+ ८  शेवटी, तुमच्या सर्वांच्या विचारांत एकता असावी,+ तसंच एकमेकांशी वागताना सहानुभूती, बंधुप्रेम, जिव्हाळा+ आणि नम्रता दाखवा.+ ९  कोणी तुमचं नुकसान केलं, तर त्याचं नुकसान करू नका+ किंवा कोणी तुमचा अपमान केला, तर त्याचा अपमान करू नका.+ उलट, आशीर्वाद देऊन* त्याची परतफेड करा+ कारण तुम्हाला याच मार्गावर चालण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. हे यासाठी, की तुम्हाला वारशात आशीर्वाद मिळावेत. १०  कारण “ज्या कोणाला जीवनात सुख आणि भरपूर आनंदाचे दिवस पाहायचे आहेत, त्याने वाईट गोष्टी बोलण्यापासून+ आपली जीभ आणि कपटीपणाच्या गोष्टी करण्यापासून आपलं तोंड आवरावं. ११  त्याने वाइटापासून वळून+ चांगलं ते करावं;+ त्याने शांती टिकवून ठेवण्याचा सतत प्रयत्न करावा.+ १२  कारण यहोवाची* नजर नीतिमानांवर असते आणि तो त्यांच्या याचना ऐकतो,+ पण वाईट गोष्टी करणाऱ्‍यांकडे यहोवा* पाठ फिरवतो.”+ १३  खरं पाहिलं, तर तुम्ही चांगल्या गोष्टी करण्यासाठी आवेशी असला, तर कोण तुमचं नुकसान करेल?+ १४  पण न्यायनीतीने वागल्यामुळे जरी तुम्हाला दुःख सोसावं लागलं, तरी तुम्ही सुखी आहात.+ लोकांना ज्या गोष्टींची भीती वाटते त्यांची भीती तुम्ही बाळगू नका* आणि अस्वस्थ होऊ नका.+ १५  तर, ख्रिस्ताला आपल्या मनात प्रभू म्हणून पवित्र माना. तुम्ही बाळगत असलेल्या आशेबद्दल जो कोणी प्रश्‍न विचारतो, त्याला उत्तर देण्यासाठी नेहमी तयार राहा, पण सौम्यतेने+ आणि मनापासून आदर दाखवून असं करा.+ १६  चांगला विवेक टिकवून ठेवा,+ म्हणजे तुमच्याबद्दल कोणत्याही प्रकारे वाईट बोललं जात असेल, तर ख्रिस्ताचे अनुयायी या नात्याने तुमची चांगली वागणूक पाहून+ तुमच्या विरोधात बोलणाऱ्‍यांना लाज वाटेल.+ १७  कारण जर चांगलं करत असल्यामुळे तुम्हाला दुःख सोसावं लागलं,+ आणि जर या गोष्टीला परवानगी देण्याची देवाची इच्छा असेल, तर वाईट केल्यामुळे दुःख सोसण्यापेक्षा, चांगलं करून दुःख सोसणं बरं आहे.+ १८  कारण आपल्या पापांबद्दल, ख्रिस्ताने सर्वकाळासाठी एकदाच मरण सोसलं.+ तो नीतिमान असूनही अनीतिमान लोकांसाठी मरण पावला.+ हे यासाठी, की तुम्ही देवाकडे यावं.+ त्याला हाडामांसाच्या शरीरात ठार मारण्यात आलं,+ पण स्वर्गीय शरीर देऊन जिवंत करण्यात आलं.+ १९  आणि या स्थितीत त्याने जाऊन कैदेत असलेल्या दुष्ट स्वर्गदूतांना* प्रचार केला.+ २०  हे तेच दुष्ट स्वर्गदूत होते, ज्यांनी पूर्वी नोहाच्या काळात देवाची आज्ञा मोडली होती. त्या वेळी, देव सहनशीलपणे वाट पाहत असताना*+ जहाजाचं* बांधकाम सुरू होतं+ आणि त्या जहाजात मोजकेच लोक, म्हणजे आठ जण* पाण्यातून सुखरूप बचावले.+ २१  ही घटना आज येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे* तुम्हाला वाचवणाऱ्‍या बाप्तिस्म्याचं* चिन्ह आहे. (बाप्तिस्मा म्हणजे शरीराचा मळ दूर करणं नाही, तर देवाला एका शुद्ध विवेकाची विनंती करणं आहे.)+ २२  ख्रिस्त, देवाच्या उजव्या हाताला आहे,+ कारण तो स्वर्गात गेला आणि स्वर्गदूत, अधिकार आणि सत्ता यांना त्याच्या अधीन करण्यात आलं.+

तळटीपा

शब्दशः “खास प्रकारे केस गुंफून.”
शब्दशः “ज्ञानाप्रमाणे.” किंवा “पत्नींना समजून घ्या.”
किंवा “त्याचं भलं करून.”
अति. क५ पाहा.
अति. क५ पाहा.
किंवा कदाचित, “त्यांच्या धमक्यांना भिऊ नका.”
शब्दशः “देवाची सहनशीलता वाट पाहत होती.”
मत्त २४:३८ तळटीप पाहा.
शब्दशः “जीव.”