स्तोत्रं ३६:१-१२

  • देवाचं मौल्यवान एकनिष्ठ प्रेम

    • दुष्ट लोक देवाची भीती बाळगत नाहीत ()

    • देव जीवनाचा उगम आहे ()

    • “तुझ्या प्रकाशानेच आम्हाला प्रकाश दिसतो” ()

यहोवाचा सेवक दावीद याचं गीत. संचालकासाठी. ३६  दुष्टाचा अपराध त्याच्या मनाशी बोलतो;देवाची भीती त्याला माहीतच नाही.+  २  तो मनातल्या मनात स्वतःची इतकी प्रशंसा करतो,की त्याला आपला अपराध दिसत नाही आणि त्याबद्दल घृणाही वाटत नाही.+  ३  त्याच्या तोंडचे शब्द कपटीपणाचे आणि हानिकारक असतात;चांगलं ते करण्याची सखोल समज त्याच्याजवळ नाही.  ४  तो बिछान्यावर पडल्या-पडल्या इतरांचं नुकसान करण्याचे बेत आखतो. त्याने चुकीचा मार्ग धरलाय;तो वाईट गोष्टी नाकारत नाही.  ५  हे यहोवा, तुझं एकनिष्ठ प्रेम आकाशाला भिडलंय,+तुझा विश्‍वासूपणा आभाळापर्यंत पोहोचलाय.  ६  तुझं नीतिमत्त्व भव्य पर्वतांसारखं* आहे;+तुझे निर्णय विशाल, अथांग सागरासारखे आहेत.+ हे यहोवा, तू माणसाला आणि प्राण्यांना सांभाळतोस.*+  ७  हे देवा, तुझं एकनिष्ठ प्रेम किती अनमोल आहे!+ तुझ्या पंखांच्या छायेत माणसं आश्रय घेतात.+  ८  तुझ्या घरातल्या उत्कृष्ट गोष्टींनी ते तृप्त होतात;+तुझ्या सुखांच्या भरून वाहणाऱ्‍या नदीतून तू त्यांना पिऊ देतोस.+  ९  जीवनाचा उगम तुझ्याजवळ आहे;+तुझ्या प्रकाशानेच आम्हाला प्रकाश दिसतो.+ १०  तुला ओळखणाऱ्‍यांना तू नेहमी एकनिष्ठ प्रेम दाखवत राहा,+सरळ मनाच्या लोकांना तुझं नीतिमत्त्व पाहू दे.+ ११  मला तुडवण्याची गर्विष्ठ माणसाला संधी देऊ नकोस मला हाकलून लावण्याची दुष्टाला परवानगी देऊ नकोस. १२  पाहा! अपराधी तिथे पडले आहेत;तू त्यांना खाली पाडलं आहेस आणि त्यांना उठता येत नाही.+

तळटीपा

किंवा “वाचवतोस.”
शब्दशः “देवाच्या पर्वतांसारखं.”