स्तोत्रं १०:१-१८
ל [लामेद ]
१० हे यहोवा, तू असा दूर का उभा राहतोस?
संकटं येतात तेव्हा तू आमच्यापासून का लपतोस?+
२ दुष्ट गर्विष्ठपणे असाहाय्य माणसाचा पाठलाग करतो,+पण त्याने रचलेल्या कटकारस्थानांमध्ये तो स्वतःच अडकेल.+
३ दुष्ट आपल्या स्वार्थी इच्छांबद्दल फुशारक्या मारतो+आणि लोभी माणसाला आशीर्वाद देतो;*
נ [नून ]तो यहोवाचा अनादर करतो.
४ दुष्ट आपल्या गर्वामुळे देवाचा शोध घेत नाही;“देवच नाही,” अशी त्याला खातरी आहे.+
५ तो जे काही करतो त्यात त्याची भरभराट होते,+पण तुझे नियम त्याच्या समजण्यापलीकडे आहेत.+
तो आपल्या सर्व विरोधकांना तुच्छ लेखतो.
६ तो आपल्या मनात म्हणतो: “मी कधीच पडणार नाही;*
पिढ्या न् पिढ्या, मला कधीच संकट पाहावं लागणार नाही.”+
פ [पे ]
७ त्याच्या तोंडात कायम शिव्याशाप, लबाड्या आणि धमक्या असतात;+छळाच्या आणि नाशाच्या गोष्टी त्याच्या जिभेवर असतात.+
८ तो वस्त्यांजवळ टपून बसलेला असतो;लपण्याच्या ठिकाणातून बाहेर येऊन, तो निर्दोष माणसाची हत्या करतो.+
ע [आयन ]
त्याचे डोळे लाचार माणसाची शिकार करण्यासाठी वाट पाहत असतात.+
९ सिंह आपल्या गुहेत* असतो, तसा दुष्ट आपल्या लपण्याच्या ठिकाणी टपलेला असतो.+
असाहाय्य माणसाला धरण्यासाठी तो टपून बसतो.
तो जाळं ओढून बंद करतो आणि असाहाय्य माणसाला त्यात धरतो.+
१० लाचार चिरडला जातो आणि त्याला धुळीला मिळवलं जातं;असाहाय्य माणसं त्याच्या तावडीत* सापडतात.
११ तो मनात म्हणतो: “देव विसरलाय.+
त्याने आपलं तोंड फिरवलंय.
तो लक्षच देत नाही.”+
ק [खुफ ]
१२ हे यहोवा, ऊठ.+ हे देवा, आपलं सामर्थ्य दाखव!+
असाहाय्य माणसांना विसरू नकोस.+
१३ दुष्ट माणूस देवाचा अनादर का करतो?
तो मनात म्हणतो: “देव माझ्याकडून हिशोब मागणार नाही.”
ר [रेश ]
१४ पण तुला संकटं आणि विपत्ती नक्की दिसतात.
त्यांना पाहून तू पाऊल उचलतोस.+
लाचार लोक तुझ्याकडे येतात;+तू अनाथाला* मदत करतोस.+
ש [शिन ]
१५ दुष्ट आणि वाईट माणसाचा हात मोडून टाक,+म्हणजे जेव्हा तू त्याची दुष्टता शोधशील,तेव्हा तुला ती सापडणार नाही.
१६ यहोवा सदासर्वकाळाचा राजा आहे.+
दुष्ट राष्ट्रांचा पृथ्वीवरून नाश झाला आहे.+
ת [ताव ]
१७ पण हे यहोवा, तू नम्र लोकांची विनंती ऐकशील.+
तू त्यांचं मन स्थिर करशील+ आणि त्यांच्याकडे लक्ष देशील.+
१८ तू अनाथांना आणि चिरडलेल्यांना न्याय देशील,+म्हणजे यापुढे पृथ्वीवरचा तुच्छ मानव त्यांना घाबरवू शकणार नाही.+
तळटीपा
^ किंवा कदाचित, “लोभी माणूस स्वतःला आशीर्वाद देतो.”
^ किंवा “डळमळणार नाही.”
^ किंवा “झुडपात.”
^ किंवा “मजबूत पंजांत.”
^ किंवा “वडील नसलेल्याला.”