इफिसकर यांना पत्र ४:१-३२

  • ख्रिस्ताच्या शरीरात एकता (१-१६)

    • माणसांच्या रूपात भेटी ()

  • जुनं आणि नवीन व्यक्‍तिमत्त्व (१७-३२)

 त्यामुळे, प्रभूसाठी कैदी असलेला मी,+ तुम्हाला विनंती करतो, की तुम्हाला बोलावण्यात आलं असल्यामुळे, देवाने बोलावलेल्या लोकांना शोभेल असं वागा.+ २  नेहमी नम्रता,*+ सौम्यता आणि सहनशीलता+ दाखवून प्रेमाने एकमेकांचं सहन करा.+ ३  तुम्हाला एकमेकांशी बांधून ठेवणाऱ्‍या शांतीच्या बंधनात, पवित्र शक्‍तीमुळे* उत्पन्‍न होणारी एकता टिकवून ठेवायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा.+ ४  ज्याप्रमाणे तुम्हाला एकाच आशेसाठी बोलावण्यात आलं होतं,+ त्याप्रमाणे एकच शरीर+ व एकच पवित्र शक्‍ती आहे.+ ५  एकच प्रभू,+ एकच विश्‍वास, एकच बाप्तिस्मा;* ६  तसंच, जो सर्वांवर आहे आणि जो सर्वांद्वारे व सर्वांमध्ये कार्य करतो, तो आपला देव आणि पिताही एकच आहे. ७  आता, ख्रिस्ताने मोफत दान वाटून दिल्याप्रमाणे, आपल्यापैकी प्रत्येकावर अपार कृपा करण्यात आली आहे.+ ८  कारण असं म्हटलं आहे: “तो उंचावर चढून गेला तेव्हा त्याने आपल्यासोबत बंदिवानांना नेलं; त्याने माणसांच्या रूपात भेटी दिल्या.”+ ९  आता, ‘तो चढून गेला’ या शब्दांचा काय अर्थ होतो? याचा अर्थ, तो खालच्या प्रदेशांत म्हणजे पृथ्वीवर उतरलाही होता, असा होत नाही का? १०  जो खाली पृथ्वीवर उतरला तोच स्वर्गापेक्षा उंचावर चढला,+ यासाठी की त्याने सगळ्या गोष्टी पूर्ण कराव्यात. ११  आणि त्याने काही प्रेषित,+ काही संदेष्टे,+ काही प्रचारक,*+ तर काही मेंढपाळ आणि शिक्षक म्हणून मंडळ्यांना दिले.+ १२  त्याने त्यांना यासाठी दिलं, की त्यांनी पवित्र जनांची सुधारणूक करावी,* इतरांची सेवा करावी आणि ख्रिस्ताच्या शरीराला मजबूत करावं;+ १३  आणि हे तोपर्यंत करावं, जोपर्यंत आपल्या सगळ्यांच्या विश्‍वासात आणि देवाच्या मुलाबद्दलच्या अचूक ज्ञानात ऐक्य येत नाही; आणि जोपर्यंत आपण प्रौढता प्राप्त करून*+ ख्रिस्ताच्या पूर्णतेची उंची गाठत नाही. १४  त्यामुळे, यापुढे आपण लहान मुलांसारखं असू नये; म्हणजे धूर्त, चलाख माणसांकडून फसवलं जाऊन, लाटांमुळे हेलकावे खाणारे आणि प्रत्येक शिकवणीच्या वाऱ्‍याने इकडेतिकडे वाहवत जाणारे असू नये.+ १५  याउलट, आपण नेहमी खरं बोलावं आणि ख्रिस्त जो आपलं मस्तक आहे,+ त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींत प्रेमापोटी वाढत जावं. १६  ख्रिस्ताद्वारे संपूर्ण शरीर+ जोडलं गेलं आहे. तो आवश्‍यकतेप्रमाणे आधार देणाऱ्‍या प्रत्येक सांध्याद्वारे शरीराच्या वेगवेगळ्या भागांना एकमेकांशी सहकार्य करायला लावतो. जेव्हा प्रत्येक अवयव योग्य प्रकारे कार्य करतो, तेव्हा शरीराची वाढ होते आणि ते प्रेमात स्वतःला मजबूत करत राहतं.+ १७  म्हणून मी तुम्हाला सांगतो आणि प्रभूसमोर असा सल्ला देतो, की विदेशी लोक आपल्या पोकळ* विचारसरणीप्रमाणे+ वागतात तसं तुम्ही यापुढे वागू नका.+ १८  त्यांच्या अज्ञानामुळे आणि त्यांची मनं कठोर* झाल्यामुळे, त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे आणि देवाकडून मिळणाऱ्‍या जीवनापासून ते दुरावले आहेत. १९  नैतिकतेच्या सगळ्या मर्यादा ओलांडून, ते लोभीपणाने सगळ्या प्रकारची अशुद्ध कामं करत राहण्यासाठी निर्लज्ज वर्तनाच्या* आहारी गेले आहेत.+ २०  पण, तुम्ही ख्रिस्ताबद्दल असं शिकला नाही. २१  येशूने सत्य शिकवलं, आणि जर तुम्ही खरोखरच त्याचं ऐकलं असेल आणि त्याच्याकडून शिकून घेतलं असेल, तर तुम्हाला त्या गोष्टी चांगल्या प्रकारे माहीत आहेत. २२  तुम्हाला शिकवण्यात आलं होतं, की तुमच्या पूर्वीच्या वागण्याप्रमाणे असलेलं आणि त्याच्या फसव्या इच्छांमुळे भ्रष्ट होत असलेलं+ तुमचं जुनं व्यक्‍तिमत्त्व, तुम्ही काढून टाकलं पाहिजे.+ २३  म्हणून तुमच्या मनोवृत्तीत* सतत बदल करत राहा, म्हणजे तुमच्यात एक नवीन मनोवृत्ती उत्पन्‍न होईल.+ २४  आणि देवाच्या इच्छेप्रमाणे निर्माण करण्यात आलेलं नवीन व्यक्‍तिमत्त्व धारण करा.+ हे व्यक्‍तिमत्त्व खऱ्‍या नीतिमत्त्वावर आणि एकनिष्ठेवर आधारित आहे. २५  आता तुम्ही खोटेपणा सोडून दिला आहे. त्यामुळे यापुढे तुमच्यापैकी प्रत्येकाने आपल्या शेजाऱ्‍याशी खरं बोलावं.+ कारण आपण सगळे एकाच शरीराचे अवयव आहोत.+ २६  तुम्ही कधी क्रोधित झाला, तरी पाप करू नका.+ सूर्य मावळेपर्यंत तुमचा राग राहू नये.+ २७  सैतानाला* संधी* देऊ नका.+ २८  चोरी करणाऱ्‍याने यापुढे चोरी करू नये. उलट, त्याने मेहनत करावी आणि आपल्या हातांनी प्रामाणिकपणे काम करावं,+ म्हणजे एखाद्या गरजू व्यक्‍तीला देण्यासाठी त्याच्याजवळ काहीतरी असेल.+ २९  तुमच्या तोंडून कोणताही वाईट* शब्द निघू नये.+ तर, गरजेप्रमाणे इतरांना प्रोत्साहन मिळू शकेल अशाच गोष्टी तुम्ही बोलाव्यात, ज्यांमुळे ऐकणाऱ्‍यांना त्यांपासून फायदा होईल.+ ३०  तसंच, देवाच्या पवित्र शक्‍तीला दुःखी करू नका,+ कारण खंडणी देऊन मुक्‍त करण्याच्या दिवसासाठी+ याच पवित्र शक्‍तीद्वारे तुमच्यावर शिक्का मारण्यात आला आहे.+ ३१  सर्व प्रकारचा द्वेष,+ राग, क्रोध, आरडाओरडा, शिवीगाळ,+ तसंच सगळा दुष्टपणा आपल्यामधून काढून टाका.+ ३२  त्याऐवजी एकमेकांशी प्रेमाने वागा आणि कोमलतेने सहानुभूती दाखवा.+ तसंच, देवाने जशी ख्रिस्ताद्वारे तुम्हाला मोठ्या मनाने क्षमा केली, तशीच तुम्हीही एकमेकांना मोठ्या मनाने क्षमा करा.+

तळटीपा

किंवा “नम्र मनोवृत्ती.”
किंवा “आनंदाच्या संदेशाची घोषणा करणारे.”
किंवा “पवित्र जनांना प्रशिक्षण द्यावं.”
किंवा “पूर्णपणे विकसित होऊन.”
किंवा “व्यर्थ; निरुपयोगी.”
शब्दशः “मंद झाल्यामुळे.”
ग्रीक, ॲसेल्गेया. शब्दार्थसूची पाहा.
किंवा “तुमच्या विचारांवर नियंत्रण करणाऱ्‍या शक्‍तीत.”
शब्दशः “दियाबलाला.” म्हणजे, निंदा करणारा.
किंवा “जागा.”
शब्दशः “कुजका.”