मीखा ५:१-१५

  • संपूर्ण पृथ्वीवर एक महान शासक येईल (१-६)

    • शासक बेथलेहेममधून येईल ()

  • उरलेले लोक दवासारखे आणि सिंहासारखे असतील (७-९)

  • देश शुद्ध केला जाईल (१०-१५)

 “शत्रूंनी वेढलेल्या शहराच्या रहिवाशांनो,तुम्ही स्वतःच्या शरीरावर घाव करून घेत आहात;आपल्याला वेढा घालण्यात आला आहे.+ ते काठीने इस्राएलच्या न्यायाधीशाच्या गालावर मारतात.+  २  आणि तू, हे बेथलेहेम एफ्राथा,+तू यहूदाच्या हजारोंमध्ये* मोजला जाण्यासाठी अगदी लहान आहेस,तरी तुझ्यातून माझ्यासाठी असा एक जण येईल, जो इस्राएलचा शासक बनेल;+त्याचा उगम* प्राचीन काळापासून, फार पूर्वीच्या दिवसांपासून आहे.  ३  म्हणून जी जन्म देणार आहे, तिने जन्म देईपर्यंततो त्यांना सोडून देईल. आणि त्याचे बाकीचे भाऊ इस्राएलच्या लोकांमध्ये परत येतील.  ४  तो उभा राहील आणि यहोवाच्या सामर्थ्याने,त्याचा देव यहोवा याच्या महान नावाने कळपाचं पालन करेल,+आणि ते सुरक्षित राहतील,+कारण आता त्याची कीर्ती पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांपर्यंत पोहोचेल.+  ५  आणि तो शांती आणेल.+ जर अश्‍शूऱ्‍याने आपल्या देशावर हल्ला केला आणि जर त्याने आपले तटबंदीचे बुरूज पायाखाली तुडवले,+तर आपण त्याच्याविरुद्ध सात मेंढपाळ आणि अधिकारी* म्हणून आठ माणसं उभी करू.  ६  ते अश्‍शूरच्या देशाला आणि निम्रोदच्या देशाला+त्याच्या सरहद्दींजवळ तलवारीने शिक्षा करतील,+आणि जेव्हा अश्‍शूरी आपल्या देशावर हल्ला करून आपला प्रदेश पायाखाली तुडवेल,तेव्हा तो शासक आपल्याला अश्‍शूऱ्‍यापासून वाचवेल.+  ७  जसं यहोवाकडून येणारं दव,आणि झाडाझुडपांवर पडणाऱ्‍या पावसाच्या सरीमाणसांची आस धरत नाहीत,*किंवा मानवांची* वाट पाहत नाहीत,तसे अनेक राष्ट्रांमध्ये याकोबचे उरलेले लोक असतील.  ८  जसा जंगलातल्या प्राण्यांमध्ये सिंह असतो;जसा एखादा तरुण सिंह* मेंढरांच्या कळपांत जाऊनत्यांच्यावर झडप घालतो आणि त्यांना फाडून टाकतो,आणि कोणीही त्यांना सोडवू शकत नाही,तसे याकोबचे उरलेले लोक बऱ्‍याच देशांमध्ये,आणि पुष्कळ राष्ट्रांमध्ये होतील.  ९  तुझ्या विरोधकांवर तू विजयी होशील,आणि तुझ्या सर्व शत्रूंचा नाश होईल.” १०  यहोवा म्हणतो, “त्या दिवशी,मी तुझ्या सर्व घोड्यांचा आणि रथांचा नाश करीन. ११  मी तुझ्या देशातली शहरं उद्ध्‌वस्त करीनआणि तुझे सर्व तटबंदीचे बुरूज पाडून टाकीन. १२  तू करत असलेली* भूतविद्या मी बंद करीन,आणि जादूटोणा करणारा कोणीही तुझ्यात उरणार नाही.+ १३  मी तुझ्या कोरीव मूर्ती आणि तुझे पूजेचे स्तंभ नष्ट करीन,आणि तू आपल्या हातांनी बनवलेल्या वस्तूंना पुन्हा कधीही नमन करणार नाहीस.+ १४  मी तुझे पूजेचे खांब* उपटून टाकीन,+आणि तुझ्या शहरांचा सर्वनाश करीन. १५  ज्या राष्ट्रांनी माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत,त्यांच्यावर मी क्रोधाने आणि रागाने सूड उगवीन.”

तळटीपा

किंवा “कुळांमध्ये.”
किंवा “सुरुवात.”
किंवा “पुढारी.”
किंवा “भरवसा ठेवत नाहीत.”
किंवा “माणसांच्या मुलांची.”
किंवा “आयाळ असलेला तरुण सिंह.”
शब्दशः “तुझ्या हातातून.”