व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

२ शमुवेलचं पुस्तक

अध्याय

पुस्तकाची रूपरेषा

    • दावीदला शौलच्या मृत्यूची खबर मिळते (१-१६)

    • शौल आणि योनाथानसाठी दावीदचं शोकगीत (१७-२७)

    • दावीद यहूदाचा राजा बनतो (१-७)

    • ईश-बोशेथ इस्राएलचा राजा बनतो (८-११)

    • दावीदच्या आणि शौलच्या घराण्यातली लढाई (१२-३२)

    • दावीद प्रबळ होत जातो ()

    • दावीदची मुलं (२-५)

    • अबनेर दावीदच्या बाजूने होतो (६-२१)

    • यवाब अबनेरला ठार मारतो (२२-३०)

    • दावीद अबनेरसाठी शोक करतो (३१-३९)

    • ईश-बोशेथचा खून (१-८)

    • खून करणाऱ्‍यांना दावीद मारून टाकतो (९-१२)

    • दावीदला संपूर्ण इस्राएलचा राजा बनवलं जातं (१-५)

    • यरुशलेमवर कब्जा (६-१६)

      • सीयोन, दावीदपूर ()

    • दावीद पलिष्ट्यांना हरवतो (१७-२५)

    • कराराची पेटी यरुशलेममध्ये आणली जाते (१-२३)

      • उज्जा कराराची पेटी धरतो; त्याचा मृत्यू होतो (६-८)

      • मीखल दावीदला तुच्छ लेखते (१६, २०-२३)

    • दावीद मंदिर बांधणार नाही (१-७)

    • दावीदसोबत राज्यासाठी केलेला करार (८-१७)

    • आभार व्यक्‍त करणारी दावीदची प्रार्थना (१८-२९)

    • दावीदने मिळवलेले विजय (१-१४)

    • दावीदचं प्रशासन (१५-१८)

    • मफीबोशेथसाठी दावीदचं एकनिष्ठ प्रेम (१-१३)

  • १०

    • अम्मोन आणि सीरियावर मिळवलेले विजय (१-१९)

  • ११

    • दावीद बथशेबासोबत व्यभिचार करतो (१-१३)

    • दावीद उरीयाला मारून टाकण्याचा कट रचतो (१४-२५)

    • दावीद बथशेबाला बायको करून घेतो (२६, २७)

  • १२

    • नाथान दावीदचं ताडन करतो (१-१५क)

    • बथशेबाच्या मुलाचा मृत्यू (१५ख-२३)

    • बथशेबा शलमोनला जन्म देते (२४, २५)

    • अम्मोनी लोकांच्या राब्बा शहरावर कब्जा (२६-३१)

  • १३

    • अम्नोन तामारचा बलात्कार करतो (१-२२)

    • अबशालोम अम्नोनला ठार मारतो (२३-३३)

    • अबशालोम गशूरला पळून जातो (३४-३९)

  • १४

    • यवाब आणि तकोवा इथली स्त्री (१-१७)

    • यवाबने केलेली युक्‍ती दावीद ओळखतो (१८-२०)

    • अबशालोमला परत येण्याची परवानगी मिळते (२१-३३)

  • १५

    • अबशालोमचा कट आणि बंड (१-१२)

    • दावीद यरुशलेमला पळून जातो (१३-३०)

    • अहिथोफेल अबशालोमला येऊन मिळतो (३१)

    • हूशयला अहिथोफेलचा सल्ला निष्फळ करायला पाठवलं जातं (३२-३७)

  • १६

    • सीबा मफीबोशेथची बदनामी करतो (१-४)

    • शिमी दावीदला शिव्याशाप देतो (५-१४)

    • अबशालोम हूशयचा स्वीकार करतो (१५-१९)

    • अहिथोफेलचा सल्ला (२०-२३)

  • १७

    • हूशय अहिथोफेलचा सल्ला निष्फळ ठरवतो (१-१४)

    • दावीदला सावधगिरीचा इशारा; तो अबशालोमपासून पळतो (१५-२९)

      • बर्जिल्ल्य आणि इतर जण अन्‍नसामग्री पुरवतात (२७-२९)

  • १८

    • अबशालोमचा पराभव आणि मृत्यू (१-१८)

    • दावीदला अबशालोमच्या मृत्यूची खबर दिली जाते (१९-३३)

  • १९

    • दावीद अबशालोमसाठी शोक करतो (१-४)

    • यवाब दावीदला खडसावतो (५-८क)

    • दावीद यरुशलेमला परत येतो (८ख-१५)

    • शिमी माफी मागतो (१६-२३)

    • मफीबोशेथ निर्दोष सिद्ध होतो (२४-३०)

    • बर्जिल्ल्यचा सन्मान (३१-४०)

    • वंशांमध्ये झालेला वादविवाद (४१-४३)

  • २०

    • शबाने केलेलं बंड; यवाब अमासाला मारून टाकतो (१-१३)

    • शबाचा पाठलाग आणि शिरच्छेद (१४-२२)

    • दावीदचं प्रशासन (२३-२६)

  • २१

    • गिबोनी लोक शौलच्या घराण्यावर सूड उगवतात (१-१४)

    • पलिष्ट्यांशी झालेली युद्धं (१५-२२)

  • २२

    • दावीदने देवाची केलेली स्तुती (१-५१)

      • “यहोवा माझा खडक” ()

      • एकनिष्ठ माणसाशी यहोवा एकनिष्ठपणे वागतो (२६)

  • २३

    • दावीदचे शेवटचे शब्द (१-७)

    • दावीदच्या शूर योद्ध्यांचे पराक्रम (८-३९)

  • २४

    • लोकांची मोजणी करून दावीदने केलेलं पाप (१-१४)

    • साथीच्या रोगामुळे ७०,००० लोकांचा मृत्यू (१५-१७)

    • दावीद वेदी बांधतो (१८-२५)

      • किंमत चुकवल्याशिवाय बलिदान नाही (२४)