तीमथ्य याला पहिलं पत्र २:१-१५

  • सर्व प्रकारच्या लोकांसाठी प्रार्थना (१-७)

    • एकच देव, एकच मध्यस्थ ()

    • सर्वांच्या मोबदल्यात दिलेली खंडणी ()

  • पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी सूचना (८-१५)

 तर सगळ्यात आधी मी अशी विनंती करतो, की सर्व प्रकारच्या माणसांसाठी याचना, प्रार्थना, इतरांच्या वतीने विनवण्या आणि उपकारस्तुतीच्या प्रार्थना केल्या जाव्यात. २  राजे आणि उच्च पदांवर असलेले अधिकारी यांच्यासाठीही प्रार्थना केल्या जाव्यात.+ हे यासाठी, की आपल्याला देवाला पूर्णपणे विश्‍वासू राहून, गांभीर्याने आणि शांतपणे जीवन जगता यावं.+ ३  आपला तारणकर्ता देव याच्या दृष्टीने हे चांगलं आणि योग्य आहे.+ ४  त्याची अशी इच्छा आहे, की सर्व प्रकारच्या लोकांचं तारण व्हावं*+ आणि त्यांना सत्याचं अचूक ज्ञान मिळावं. ५  कारण, एकच देव+ आहे. तसंच, देवामध्ये आणि मानवांमध्ये+ एकच मध्यस्थ+ आहे, म्हणजे एक मानव, अर्थात ख्रिस्त येशू.+ ६  त्याने सर्वांच्या* मोबदल्यात खंडणी म्हणून स्वतःला अर्पण केलं.+ या गोष्टीबद्दल ठरवलेली वेळ आल्यावर साक्ष दिली जाईल. ७  हीच साक्ष देण्यासाठी,+ मला घोषणा करणारा आणि प्रेषित,+ म्हणजे विश्‍वास आणि सत्य यांबद्दल सांगण्यासाठी विदेश्‍यांचा शिक्षक+ म्हणून नेमण्यात आलं आहे. मी खरं बोलतो, खोटं बोलत नाही. ८  म्हणून माझी अशी इच्छा आहे, की सर्व ठिकाणी पुरुषांनी राग आणि वादविवाद सोडून,+ शुद्ध मनाने प्रार्थना करत राहावी.*+ ९  त्याच प्रकारे, स्त्रियांनी योग्य* पेहराव करून, शालीनतेने आणि विचारशीलपणे* स्वतःला सजवावं. त्यांनी खास प्रकारच्या केशरचना करून,* तसंच सोनं, मोती किंवा महागडे कपडे घालून नाही,+ १०  तर स्वतःला देवाच्या उपासक म्हणवणाऱ्‍या स्त्रियांना शोभेल अशा प्रकारे,+ म्हणजे चांगली कामं करून आपलं सौंदर्य वाढवावं. ११  स्त्रीने पूर्ण अधीनतेने शांत* राहून शिकावं.+ १२  मी स्त्रीला शिकवायची किंवा पुरुषावर अधिकार चालवायची परवानगी देत नाही. तिने शांत* राहावं.+ १३  कारण आधी आदामला आणि मग हव्वाला बनवण्यात आलं.+ १४  तसंच, आदाम फसवला गेला नाही, तर स्त्री ही पूर्णपणे फसली+ आणि अपराधी बनली. १५  तरीसुद्धा, मुलांना जन्म देण्याद्वारे ती सुरक्षित राहील.+ पण, यासाठी तिने* विचारशीलपणा,*+ तसंच विश्‍वास, प्रेम आणि पवित्रता यांत टिकून राहणं गरजेचं आहे.

तळटीपा

किंवा “लोकांना वाचवलं जावं.”
किंवा “सर्व प्रकारच्या लोकांच्या.”
शब्दशः “हात वर करून प्रार्थना करत राहावी.”
किंवा “आदरणीय.”
शब्दशः “निरोगी मनाने.”
शब्दशः “खास प्रकारे केस गुंफून.”
किंवा “गप्प.”
किंवा “गप्प.”
शब्दशः “त्यांनी.”
शब्दशः “मनाचा निरोगीपणा.”