व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहेज्केलचं पुस्तक

अध्याय

पुस्तकाची रूपरेषा

    • यहेज्केलला बाबेलमध्ये देवाकडून दृष्टान्त मिळतात (१-३)

    • यहोवाच्या स्वर्गीय रथाचा दृष्टान्त (४-२८)

      • वादळ, ढग आणि आग ()

      • चार जिवंत प्राणी (५-१४)

      • चार चाकं (१५-२१)

      • बर्फासारखं चमकणारं सपाट छत (२२-२४)

      • यहोवाचं राजासन (२५-२८)

    • यहेज्केलची संदेष्टा म्हणून नेमणूक (१-१०)

      • ‘ते तुझं ऐकोत किंवा न ऐकोत’ ()

      • शोकगीतांची गुंडाळी दाखवली जाते (९, १०)

    • यहेज्केलला देवाकडून मिळालेली गुंडाळी खायला सांगितली जाते (१-१५)

    • यहेज्केलची पहारेकरी म्हणून नेमणूक (१६-२७)

      • ताकीद दिली नाही तर रक्‍तदोषी (१८-२१)

    • यरुशलेमला वेढा पडेल हे चित्र काढून दाखवलं जातं (१-१७)

      • ३९० दिवस आणि ४० दिवस पापांचा दोष वाहणं (४-७)

    • यरुशलेमचा नाश होईल हे दाखवलं जातं (१-१७)

      • संदेष्ट्याच्या कापलेल्या केसांचे तीन भाग (१-४)

      • यरुशलेमचं वागणं इतर राष्ट्रांपेक्षाही वाईट (७-९)

      • बंडखोरांना तीन गोष्टींनी शिक्षा (१२)

    • इस्राएलच्या डोंगरांविरुद्ध भविष्यवाणी (१-१४)

      • घृणास्पद मूर्तींना अपमानित केलं जाईल (४-६)

      • “तेव्हा तुम्हाला समजेल की मी यहोवा आहे” ()

    • अंत आलाय (१-२७)

      • पूर्वी कधीही आलं नाही असं संकट ()

      • पैसा रस्त्यावर फेकून दिला जाईल (१९)

      • मंदिर अशुद्ध केलं जाईल (२२)

    • यहेज्केलला दृष्टान्तात यरुशलेमला नेलं जातं (१-४)

    • मंदिरात घृणास्पद गोष्टी पाहायला मिळतात (५-१८)

      • स्त्रिया तम्मूज दैवतासाठी शोक करतात (१४)

      • माणसं सूर्याची उपासना करतात (१६)

    • शिक्षा करणारे सहा जण आणि कमरेला दौत अडकवलेला माणूस (१-११)

      • न्यायदंडाची सुरुवात मंदिरापासून ()

  • १०

    • चाकांच्या मधून आग घेतली जाते (१-८)

    • करुबांचं आणि चाकांचं वर्णन (९-१७)

    • देवाचं तेज मंदिरातून निघून जातं (१८-२२)

  • ११

    • दुष्ट अधिकाऱ्‍यांना शिक्षा सुनावण्यात येते (१-१३)

      • यरुशलेम नगरीची तुलना कढईशी केली जाते (३-१२)

    • पुन्हा स्थापन करण्याचं वचन (१४-२१)

      • “नवीन मनोवृत्ती” निर्माण केली जाईल (१९)

    • देवाचं तेज यरुशलेममधून निघून जातं (२२, २३)

    • यहेज्केल दृष्टान्तात खास्द्यांच्या देशात परत येतो (२४, २५)

  • १२

    • लोक बंदिवासात कसं जातील याचं प्रात्यक्षिक (१-२०)

      • बंदिवासात जाण्यासाठी सामान बांधलं जातं (१-७)

      • लोकांचा प्रधान अंधारात बाहेर पडेल (८-१६)

      • चिंतेची भाकर आणि दहशतीचं पाणी (१७-२०)

    • म्हण खोटी ठरेल (२१-२८)

      • “माझा कोणताही शब्द पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही” (२८)

  • १३

    • खोट्या संदेष्ट्यांविरुद्ध भविष्यवाणी (१-१६)

      • चुना लावलेली भिंत पडेल (१०-१२)

    • खोटा संदेश देणाऱ्‍या स्त्रियांविरुद्ध भविष्यवाणी (१७-२३)

  • १४

    • मूर्तिपूजा करणाऱ्‍यांचा धिक्कार (१-११)

    • यरुशलेम शिक्षा चुकवू शकत नाही (१२-२३)

      • नीतिमान माणसं: नोहा, दानीएल आणि ईयोब (१४, २०)

  • १५

    • यरुशलेम ही काहीही कामाची नसलेली द्राक्षवेल (१-८)

  • १६

    • यरुशलेमसाठी देवाचं प्रेम (१-६३)

      • टाकून दिलेल्या बाळासारखी होती (१-७)

      • देव तिला सजवतो आणि तिच्याशी लग्नाचा करार करतो (८-१४)

      • ती विश्‍वासघात करते (१५-३४)

      • व्यभिचार केल्यामुळे तिला शिक्षा (३५-४३)

      • तिची तुलना शोमरोन आणि सदोमशी (४४-५८)

      • देव आपला करार आठवतो (५९-६३)

  • १७

    • दोन गरुड आणि एक द्राक्षवेल यांचं कोडं (१-२१)

    • एक कोवळी डहाळी मोठं देवदाराचं झाड बनेल (२२-२४)

  • १८

    • प्रत्येक जण स्वतःच्या पापासाठी स्वतःच जबाबदार (१-३२)

      • जो कोणी पाप करतो, तोच मरेल ()

      • वडिलांच्या अपराधांचा दोष मुलावर नाही (१९, २०)

      • दुष्ट माणसाच्या मृत्यूने देवाला आनंद होत नाही (२३)

      • पश्‍चात्ताप केल्यामुळे जीवन (२७, २८)

  • १९

    • इस्राएलच्या प्रधानांबद्दल एक शोकगीत (१-१४)

  • २०

    • इस्राएलने केलेल्या बंडाचा इतिहास (१-३२)

    • इस्राएली लोकांना परत आपल्या देशात आणायचं वचन (३३-४४)

    • दक्षिणेविरुद्ध भविष्यवाणी (४५-४९)

  • २१

    • देवाच्या न्यायदंडाची तलवार म्यानातून बाहेर पडेल (१-१७)

    • बाबेलचा राजा यरुशलेमवर हल्ला करेल (१८-२४)

    • इस्राएलच्या दुष्ट प्रधानाला काढून टाकलं जातं (२५-२७)

      • “आपला मुकुट काढून टाक” (२६)

      • “ज्याला तो मिळण्याचा कायदेशीर हक्क आहे,” तो येईपर्यंत (२७)

    • अम्मोनी लोकांविरुद्ध तलवार (२८-३२)

  • २२

    • यरुशलेम एक रक्‍तदोषी नगरी (१-१६)

    • इस्राएल धातूच्या टाकाऊ गाळासारखा (१७-२२)

    • इस्राएलच्या पुढाऱ्‍यांचा आणि लोकांचा धिक्कार (२३-३१)

  • २३

    • विश्‍वासघात करणाऱ्‍या दोन बहिणी (१-४९)

      • अहलाचा अश्‍शूरसोबत व्यभिचार (५-१०)

      • अहलीबाचा बाबेल आणि इजिप्तसोबत व्यभिचार (११-३५)

      • दोन्ही बहिणींना शिक्षा (३६-४९)

  • २४

    • यरुशलेम गंज लागलेल्या कढईसारखी (१-१४)

    • यहेज्केलच्या बायकोचा मृत्यू एक चिन्ह (१५-२७)

  • २५

    • अम्मोनविरुद्ध भविष्यवाणी (१-७)

    • मवाबविरुद्ध भविष्यवाणी (८-११)

    • अदोमविरुद्ध भविष्यवाणी (१२-१४)

    • पलिष्ट्यांविरुद्ध भविष्यवाणी (१५-१७)

  • २६

    • सोरविरुद्ध भविष्यवाणी (१-२१)

      • मासेमारीचं जाळं सुकवलं जातं अशा ठिकाणासारखं (, १४)

      • दगड आणि माती समुद्रात फेकली जाईल (१२)

  • २७

    • सोरच्या बुडत्या जहाजासाठी एक शोकगीत (१-३६)

  • २८

    • सोरच्या राजाविरुद्ध भविष्यवाणी (१-१०)

      • “मी देव आहे” (, )

    • सोरच्या राजासाठी एक शोकगीत (११-१९)

      • ‘तू एदेन बागेत होतास’ (१३)

      • “तुला संरक्षण करणारा अभिषिक्‍त करूब म्हणून नेमलं होतं” (१४)

      • “तुझ्यात अनीती दिसून आली” (१५)

    • सीदोनविरुद्ध भविष्यवाणी (२०-२४)

    • इस्राएलचं पुनर्वसन (२५, २६)

  • २९

    • फारोविरुद्ध भविष्यवाणी (१-१६)

    • बाबेलला मोबदला म्हणून इजिप्त देश दिला जाईल (१७-२१)

  • ३०

    • इजिप्तविरुद्ध भविष्यवाणी (१-१९)

      • नबुखद्‌नेस्सर हल्ला करेल याविषयी भविष्यवाणी (१०)

    • फारोची ताकद मोडली जाते (२०-२६)

  • ३१

    • उंच देवदार वृक्ष, इजिप्त खाली पडतो (१-१८)

  • ३२

    • फारोसाठी आणि इजिप्तसाठी शोकगीत (१-१६)

    • इजिप्तला सुंता न झालेल्यांसोबत दफन केलं जाईल (१७-३२)

  • ३३

    • पहारेकऱ्‍याच्या जबाबदाऱ्‍या (१-२०)

    • यरुशलेमच्या नाशाची खबर (२१, २२)

    • उद्ध्‌वस्त झालेल्या शहरातल्या रहिवाशांसाठी संदेश (२३-२९)

    • लोक संदेशाकडे दुर्लक्ष करतात (३०-३३)

      • यहेज्केल “प्रेमगीतासारखा” (३२)

      • “त्यांच्यामध्ये खरोखर एक संदेष्टा होता” (३३)

  • ३४

    • इस्राएलच्या मेंढपाळांविरुद्ध भविष्यवाणी (१-१०)

    • यहोवा आपल्या मेंढरांची काळजी घेतो (११-३१)

      • “माझा सेवक दावीद” त्यांचा मेंढपाळ होईल (२३)

      • “शांतीचा करार” (२५)

  • ३५

    • सेईरच्या डोंगरांविरुद्ध भविष्यवाणी (१-१५)

  • ३६

    • इस्राएलच्या डोंगरांबद्दल भविष्यवाणी (१-१५)

    • इस्राएल देश पुन्हा वसवला जाईल (१६-३८)

      • मी माझं महान नाव पवित्र करीन (२३)

      • “एदेन बागेसारखा” (३५)

  • ३७

    • वाळून गेलेल्या हाडांच्या खोऱ्‍याचा दृष्टान्त (१-१४)

    • दोन काठ्या जोडून एक केल्या जातील (१५-२८)

      • एकच राष्ट्र आणि त्यावर एकच राजा (२२)

      • कायम टिकणारा शांतीचा करार (२६)

  • ३८

    • इस्राएलवर गोगचा हल्ला (१-१६)

    • गोगवर यहोवाचा क्रोध भडकतो (१७-२३)

      • ‘राष्ट्रांना कळून येईल की मी यहोवा आहे’ (२३)

  • ३९

    • गोग आणि त्याच्या सैन्याचा नाश (१-१०)

    • हमोन-गोगच्या खोऱ्‍यात पुरलं जाईल (११-२०)

    • इस्राएल देश पुन्हा वसवला जाईल (२१-२९)

      • इस्राएलवर देवाच्या पवित्र शक्‍तीचा वर्षाव (२९)

  • ४०

    • दृष्टान्तात यहेज्केलला इस्राएलमध्ये आणलं जातं (१, २)

    • यहेज्केलला दृष्टान्तात मंदिर दिसतं (३, ४)

    • अंगणं आणि प्रवेश-इमारती (५-४७)

      • बाहेरच्या बाजूला असलेली पूर्वेकडची प्रवेश-इमारत (६-१६)

      • बाहेरचं अंगण; इतर प्रवेश-इमारती (१७-२६)

      • आतलं अंगण आणि प्रवेश-इमारती (२७-३७)

      • मंदिरातल्या सेवेसाठी असलेल्या खोल्या (३८-४६)

      • वेदी (४७)

    • मंदिराचं द्वारमंडप (४८, ४९)

  • ४१

    • मंदिरातलं पवित्र स्थान (१-४)

    • मंदिराची भिंत आणि त्याला लागून असलेल्या खोल्या (५-११)

    • मंदिराच्या पश्‍चिमेकडची इमारत (१२)

    • इमारतींचं मोजमाप घेतलं जातं (१३-१५क)

    • मंदिराचा आतला भाग (१५ख-२६)

  • ४२

    • जेवणाच्या खोल्यांचा विभाग (१-१४)

    • मंदिराच्या चारही बाजूंचं माप घेतलं जातं (१५-२०)

  • ४३

    • यहोवाच्या वैभवाच्या तेजाने मंदिर भरून जातं (१-१२)

    • वेदी (१३-२७)

  • ४४

    • पूर्वेकडच्या प्रवेश-इमारतीचं दार बंदच राहील (१-३)

    • विदेश्‍यांबद्दलचे कायदे आणि नियम (४-९)

    • लेवी आणि याजक यांच्यासाठी नियम (१०-३१)

  • ४५

    • पवित्र दानाची जमीन आणि शहर (१-६)

    • प्रधानाचा हिस्सा (७, ८)

    • प्रधानांनी प्रामाणिकपणे वागावं (९-१२)

    • लोकांनी आणलेली दानं आणि प्रधान (१३-२५)

  • ४६

    • खास दिवसांसाठी असलेली अर्पणं (१-१५)

    • प्रधानाच्या मालमत्तेचा वारसा (१६-१८)

    • बलिदानाचं मांस शिजवण्याच्या जागा (१९-२४)

  • ४७

    • मंदिरातून वाहणारी नदी (१-१२)

      • पाण्याची खोली वाढत जाते (२-५)

      • मृत समुद्राचं पाणी निरोगी होतं (८-१०)

      • दलदलीची ठिकाणं खारीच राहतात (११)

      • झाडांच्या फळांचा खाण्यासाठी आणि पानांचा औषधांसाठी वापर (१२)

    • देशाच्या सीमा (१३-२३)

  • ४८

    • देशाच्या जमिनीची वाटणी (१-२९)

    • शहराचे १२ दरवाजे (३०-३५)

      • शहराचं नाव “यहोवा तिथे आहे” (३५)