व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

२ आपल्या दुःखांसाठी आपण स्वतः जबाबदार आहोत का?

२ आपल्या दुःखांसाठी आपण स्वतः जबाबदार आहोत का?

हे जाणून घेणं का महत्त्वाचं आहे?

कारण जर तसं असेल, तर काही प्रमाणात हे दुःख कमी करणं आपल्या हातात आहे असं म्हणता येईल.

विचार करा

खाली दिलेल्या समस्यांसाठी मानव कितपत जबाबदार आहे?

  • शोषण.

    जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार, प्रत्येक चार व्यक्‍तींपैकी एका व्यक्‍तीचं तिच्या लहानपणी कधी ना कधी शारीरिक शोषण झालं आहे. तसंच, तीन स्त्रियांपैकी एका स्त्रीचं तिच्या जीवनात कधी ना कधी शारीरिक किंवा लैंगिक शोषण (किंवा दोन्ही) होतं.

  • जवळच्या व्यक्‍तीचा मृत्यू.

    जागतिक आरोग्य संघटनेने, २०१८ सालचा जागतिक आरोग्य अहवाल  यात असं सांगितलं, की “२०१६ मध्ये जगभरात जवळजवळ ४,७७,००० जणांचा खून करण्यात आला.” तसंच, त्याच वर्षी जवळजवळ १,८०,००० लोकांचा युद्धामुळे किंवा छोट्या-मोठ्या लढायांमुळे मृत्यू झाला.

  • आजारपण.

    नॅश्‍नल जियोग्राफिक  मासिकाच्या एका लेखात फ्रान स्मित यांनी असं लिहिलं होतं, की एक अब्जापेक्षा जास्त लोक धूम्रपान करतात आणि तंबाखूमुळे बरेच जीवघेणे आजार होतात, जसं की, हृदयविकार, लकवा आणि फुप्फुसाचा कर्करोग.

  • समाजात असलेला भेदभाव.

    मानसशास्त्रज्ञ जे वॉट्‌स यांनी असं लिहिलं, की आज गरिबी, अधिकार, जाती आणि लिंग यांमुळे लोकांमध्ये भेदभाव केले जात आहेत. तसंच लोकांना बळजबरीने आपलं घरदार सोडून दुसऱ्‍या ठिकाणी जायला भाग पाडलं जात आहे. त्यासोबतच लोकांमध्ये स्पर्धात्मक वृत्तीही वाढत चालली आहे. या सगळ्या कारणांमुळे आज चिंता, निराशा, तणाव यांसारखे मानसिक आजार वाढत चालले आहेत.

    आणखी जाणून घ्या

    देवाने पृथ्वी का बनवली?  हा व्हिडिओ jw.org/mr या वेबसाईटवर पाहा.

बायबल काय म्हणतं?

जगात असलेल्या समस्यांसाठी मानव बऱ्‍याच प्रमाणात जबाबदार आहे.

यातल्या बऱ्‍याच समस्या मानवी सरकारांमुळे निर्माण होतात. ही सरकारं लोकांची सेवा करण्याचा दावा तर करतात पण खरंतर त्यांनी लोकांचं जगणं कठीण केलं आहे.

“एक मनुष्य दुसऱ्‍यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान करतो.”उपदेशक ८:९.

समस्या कमी केल्या जाऊ शकतात.

बायबलची तत्त्वं लागू केल्यामुळे आपल्याला चांगलं आरोग्य मिळेल. तसंच इतरांसोबत शांतीचे संबंध टिकवून ठेवता येतील.

“शांत अंतःकरण देहाचे जीवन आहे, पण मत्सराने हाडे कुजतात.”नीतिसूत्रे १४:३०.

“सर्व प्रकारचा द्वेष, राग, क्रोध, आरडाओरडा, शिवीगाळ, तसाच सर्व दुष्टपणा आपल्यामधून काढून टाका.”इफिसकर ४:३१.