व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

४ देवाने आपल्याला दु:ख भोगण्यासाठीच निर्माण केलं होतं का?

४ देवाने आपल्याला दु:ख भोगण्यासाठीच निर्माण केलं होतं का?

हे जाणून घेणं का महत्त्वाचं आहे?

या प्रश्‍नाच्या उत्तरामुळे जीवनाबद्दलचा आपला दृष्टिकोन बदलू शकतो.

विचार करा

ज्या देवाने इतकी सुंदर सृष्टी बनवली, तो आपल्याला दु:खाने भरलेलं आयुष्य देईल का?

देवा-धर्माला न मानणारे लोक दु:खाचं कारण देऊन देवाच्या उद्देशांवर किंवा त्याच्या अस्तित्वावरच शंका घेतात. दु:ख आणि समस्या असल्यामुळे ते असा विचार करतात: (१) देवाकडे दु:ख काढून टाकण्याची क्षमता नाही. (२) आपल्याबद्दल काळजी नसल्यामुळे तो दु:ख काढून टाकत नाही. (३) देव अस्तित्वातच नाही.

आपल्या दु:खामागची ही खरी कारणं आहेत का?

आणखी जाणून घ्या

बायबल देवाकडून असल्याची खात्री आपण का बाळगू शकतो?  हा व्हिडिओ jw.org/mr या वेबसाईटवर पाहा.

बायबल काय म्हणतं?

देवाने आपल्याला दु:ख भोगण्यासाठी निर्माण केलेलं नाही.

आपण जीवनाचा आनंद घ्यावा अशी त्याची इच्छा आहे.

“मनुष्यांनी आमरण सुखाने राहावे व हित साधावे यापरते इष्ट त्यांस काही नाही हे मला कळून आले आहे. तरी प्रत्येक मनुष्याने खावे, प्यावे व आपला सर्व उद्योग करून सुख मिळवावे हीही देवाची देणगी आहे.”उपदेशक ३:१२, १३.

देवाने पहिल्या मानवी जोडप्याला एक चांगली सुरुवात करून दिली होती.

त्यांनी किंवा त्यांच्या वंशजांनी म्हणजे आपण दु:ख सहन करावं अशी त्याची इच्छा नव्हती.

“देव त्यास म्हणाला: फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा.”उत्पत्ति १:२८.

पहिल्या मानवी जोडप्याने जाणूनबुजून देवाची आज्ञा मोडली आणि स्वत:चा वेगळा मार्ग निवडला.

याचा परिणाम म्हणजे त्यांनी स्वत:वर आणि त्यांच्या वंशजांवर म्हणजे आपल्यावर दु:ख ओढवून घेतलं.

“ज्या प्रकारे एका माणसाद्वारे पाप जगात आले आणि पापाद्वारे मरण आले, त्याच प्रकारे मरण सर्व माणसांमध्ये पसरले, कारण त्या सर्वांनी पाप केले होते.”रोमकर ५:१२. *

आपण देवाच्या मार्गदर्शनाशिवाय जगू शकतो अशा प्रकारे त्याने आपल्याला निर्माण केलेलं नाही.

जसं आपल्याला पाण्याखाली राहण्यासाठी बनवलेलं नाही, तसंच आपल्याला एकमेकांवर राज्य करण्यासाठीही बनवलेलं नाही.

“पावले नीट टाकणे हे चालणाऱ्‍या मनुष्याच्या हाती नाही.”यिर्मया १०:२३.

आपण दु:ख भोगावं अशी देवाची इच्छा नाही.

तर आपण आपल्या जीवनात होताहोईल तितक्या समस्या टाळाव्यात अशी त्याची इच्छा आहे.

“तू माझ्या आज्ञा लक्षपूर्वक ऐकतास तर बरे होते; मग तुझी शांती नदीसारखी . . . झाली असती.”यशया ४८:१८.

^ परि. 17 बायबलमध्ये पाप हा शब्द फक्‍त वाईट कामांसाठीच  नाही तर वाईट वृत्तीसाठीही  वापरण्यात आला आहे. ही वृत्ती आपल्या सगळ्यांनाच वारशाने मिळाली आहे.