व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सावध राहा! क्र. २ २०२० | दुःखाबद्दल ५ प्रश्‍नांची उत्तरं

प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी समस्या येतात. आजारामुळे, एखाद्या अपघातामुळे, नैसर्गिक विपत्तीमुळे किंवा हिंसेमुळे.

असं का होतं याचं उत्तर लोक शोधत असतात.

  • काही जण दुःखासाठी नशिबाला दोष देतात. तर काहींना असं वाटतं की आपल्यासोबत जे घडतं त्यावर आपला काहीच ताबा नाही.

  • काही जण कर्मावर विश्‍वास ठेवतात. ते म्हणतात, की आपण या जन्मात किंवा मागच्या जन्मात केलेल्या चुकांमुळे आज आपल्याला दुःख भोगावं लागतं.

पण समस्या का येतात याचं उत्तर लोकांना मिळत नाही, त्यामुळे त्यांच्या मनात आणखी प्रश्‍न निर्माण होतात.

लोक काय मानतात?

दुःख का येतं याबद्दल वेगवेगळ्या धर्मांचे लोक काय मानतात हे जाणून घ्या.

१ आपल्या दु:खासाठी देव जबाबदार आहे का?

देवाबद्दल खोटी माहिती पसरवणाऱ्‍या शिकवणींमुळे लोकांची फसवणूक झाली आहे. सत्य काय आहे?

२ आपल्या दुःखांसाठी आपण स्वतः जबाबदार आहोत का?

कारण जर तसं असेल, तर काही प्रमाणात हे दुःख कमी करणं आपल्या हातात आहे असं म्हणता येईल.

३ चांगल्या लोकांना दुःख का सहन करावं लागतं?

बायबल याचं उत्तर समजून घ्यायला आपल्याला मदत करतं.

४ देवाने आपल्याला दु:ख भोगण्यासाठीच निर्माण केलं होतं का?

ज्या देवाने इतकी सुंदर सृष्टी बनवली, तो आपल्याला दु:खाने भरलेलं आयुष्य देईल का? जर नाही, तर मग आपल्यावर दुःख का आलं?

५ आपलं दुःख कधी संपेल का?

देव दुःख नेमकं कसं काढून टाकणार आहे हे बायबल आपल्याला सांगतं.

तुम्हाला मदत हवी आहे का?

आपल्या समस्या सोडवणं अशक्य आहे असं वाटत असलं तरीही, त्यासाठी आपल्याकडे भरवशालायक मार्गदर्शन उपलब्ध आहे.