व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

१ आपल्या दु:खासाठी देव जबाबदार आहे का?

१ आपल्या दु:खासाठी देव जबाबदार आहे का?

हे जाणून घेणं का महत्त्वाचं आहे?

दु:खासाठी देवच जबाबदार आहे असं बरेच लोक मानतात आणि म्हणून त्यांचा त्याच्यावरचा विश्‍वास उडाला आहे.

विचार करा

आज बरेच धार्मिक पुढारी देवच आपल्या दु:खासाठी जबाबदार आहे असं शिकवतात. उदाहरणार्थ, ते असं म्हणतात की:

  • नैसर्गिक विपत्ती आणून देव आपल्याला शिक्षा देतो.

  • देवाला स्वर्गात आणखी जास्त देवदूत हवे असतात म्हणून तो मुलांना आपल्याकडे बोलवून घेतो.

  • देव युद्धांचं समर्थन करतो.

या तिन्ही गोष्टींमुळे लोकांना मोठ्या प्रमाणावर दु:ख-कष्ट सोसावे लागतात. पण, असं असू शकतं का की धार्मिक पुढारीच देवाबद्दल खोटं शिकवत असतील? आणि देवाने त्यांना नाकारलं असेल तर?

आणखी जाणून घ्या

बायबलचा अभ्यास का करावा?  हा व्हिडिओ jw.org/mr या वेबसाईटवर पाहा.

बायबल काय म्हणतं?

देव आपल्यावर दु:ख आणत नाही.

कारण जर त्याने तसं केलं असतं, तर बायबलमध्ये दिलेल्या त्याच्या गुणांच्या हे विरोधात असतं. जसं की बायबल म्हणतं:

“त्याचे [देवाचे] सर्व मार्ग न्यायाचे आहेत . . . तो न्यायी व सरळ आहे.”अनुवाद ३२:४.

“देवाकडून दुष्कर्म व्हावे, सर्वसमर्थाकडून अन्याय व्हावा, ही कल्पनाही करायला नको.”ईयोब ३४:१०.

“सर्वसमर्थ प्रभू विपरीत न्याय करत नाही.”ईयोब ३४:१२.

देवाबद्दल खोटं शिकवणारे धर्म त्याला मान्य नाहीत.

यात अशा धर्मांचा समावेश आहे, जे शिकवतात की आपल्यावर येणाऱ्‍या दु:खासाठी देवच जबाबदार आहे. तसंच, यात असे धर्मही आहेत जे युद्धात आणि हिंसेत भाग घेतात.

“संदेष्टे माझ्या नामाने असत्य संदेश देतात; मी त्यांना पाठवले नाही, मी त्यांच्याबरोबर बोललो नाही; ते खोटा दृष्टान्त . . . व आपल्या मनातील कपटयोजना संदेशरूपाने तुम्हाला सांगतात.”यिर्मया १४:१४.

येशूने धार्मिक ढोंगीपणाचा धिक्कार केला.

“मला ‘प्रभू, प्रभू,’ म्हणणारा प्रत्येक जण स्वर्गाच्या राज्यात जाणार नाही, तर स्वर्गातील माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करणाराच त्या राज्यात जाईल. त्या दिवशी पुष्कळ लोक मला म्हणतील: ‘प्रभू, प्रभू, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिले नाहीत का? तुझ्या नावाने दुरात्मे काढले नाहीत का? आणि तुझ्या नावाने अनेक अद्‌भुत कृत्ये केली नाहीत का?’ पण, मी त्यांना स्पष्टपणे सांगेन: ‘अरे वाईट कामं करणाऱ्‍यांनो! मी तुम्हाला कधीच ओळखत नव्हतो, माझ्यापुढून निघून जा!’”मत्तय ७:२१-२३.