व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

५ आपलं दुःख कधी संपेल का?

५ आपलं दुःख कधी संपेल का?

हे जाणून घेणं का महत्त्वाचं आहे?

जर दुःख खरंच संपणार असेल तर जीवनाकडे आणि देवाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून जाईल.

विचार करा

बऱ्‍याच लोकांना दुःख काढून टाकावंसं वाटतं. पण ते पूर्णपणे काढून टाकण्याची क्षमता त्यांच्यात नाही. पुढील गोष्टींचा विचार करा:

आज नवनवीन औषधांचा शोध लागला असूनही . . .

  • हृदयविकारांमुळे सर्वात जास्त लोकांचा मृत्यू होतो.

  • कॅन्सरमुळे दरवर्षी लाखो लोक मृत्यूमुखी पडतात.

  • डॉक्टरांना अजूनही बऱ्‍याच रोगांवर पूर्णपणे उपचार करता येत नाही. तसंच नवनवीन रोग रोज उद्‌भवत आहेत आणि जुने आजार पुन्हा डोकं वर काढत आहेत, असं फ्रन्टियर्स इन इम्युनोलॉजी  या मासिकात डॉ. डेविड ब्लूम म्हणतात.

बऱ्‍याच देशांत समृद्धी आली असूनही . . .

  • दरवर्षी लाखो मुलं मरतात आणि हे सहसा अशा क्षेत्रांमध्ये घडतं जिथे लोक गरिबीत राहतात.

  • करोडो लोकांकडे शौचालयाची व्यवस्था नाही.

  • लाखो लोकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नाही.

मानवी हक्कांबद्दल जागरुकता वाढली असूनही . . .

  • बऱ्‍याच देशांत मानवी तस्करी होत आहे. आणि तस्करी करणाऱ्‍या लोकांना शिक्षा केली जात नाही. असं का? संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या एका अहवालात म्हटलं आहे, की एकतर अधिकाऱ्‍यांना याबद्दल माहीत नाही किंवा तस्करांना शिक्षा करण्यात ते अपयशी ठरले आहेत.

    आणखी जाणून घ्या

    देवाचं राज्य काय आहे?  हा व्हिडिओ jw.org/mr या वेबसाईटवर पाहा.

बायबल काय म्हणतं?

देवाला आपली काळजी आहे.

आपण सहन करत असलेल्या दुःखाबद्दल आणि त्रासाबद्दल त्याला माहीत आहे.

“कारण त्याने पीडिताची दैन्यावस्था तुच्छ लेखली नाही व तिचा वीट मानला नाही त्याने आपले मुख त्याच्या दृष्टिआड केले नाही; तर त्याने धावा केला तेव्हा त्याने तो ऐकला.”स्तोत्र २२:२४.

“आपल्या सर्व चिंता त्याच्यावर टाकून द्या, कारण त्याला तुमची काळजी आहे.”१ पेत्र ५:७.

दुःख कायम राहणार नाही.

बायबलमध्ये असं सांगितलं आहे की देवाचा आपल्यासाठी असलेला उद्देश पूर्ण होईल.

“देव . . . त्यांच्या डोळ्यांतून प्रत्येक अश्रू पुसून टाकेल, आणि यापुढे मरण नसेल; तसंच शोक, रडणं किंवा दुःखही नसेल; कारण, आधीच्या गोष्टी नाहीशा झाल्या आहेत.”प्रकटीकरण २१:३, ४.

देव माणसांच्या दुःखामागचं कारण काढून टाकेल.

हे तो आपल्या राज्याद्वारे करेल. बायबल सांगतं की हे एक खरंखुरं सरकार आहे.

“देव एका राज्याची स्थापना करेल, त्याचा कधी भंग होणार नाही; त्याचे प्रभुत्व दुसऱ्‍याच्या हाती कधी जाणार नाही; तर ते या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करेल व ते सर्वकाळ टिकेल.”दानीएल २:४४.