व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

लोक काय मानतात?

लोक काय मानतात?

हिंदू धर्म मानणारे

असा विश्‍वास करतात, की एखाद्याने या किंवा आधीच्या जन्मात केलेल्या कर्मांमुळे त्याला दुःख भोगावं लागतं. त्यांचं असंही मानणं आहे, की एक व्यक्‍ती जेव्हा स्वतःला जगाच्या मोह-मायेपासून वेगळं करते, तेव्हा तिला पुनर्जन्माच्या चक्रातून सुटका मिळते आणि तिला मोक्ष प्राप्त होतो.

मुस्लिम धर्म मानणारे

असा विश्‍वास करतात, की पापाची शिक्षा आणि विश्‍वासाची परीक्षा होण्यासाठी माणसाच्या जीवनात दुःख येतं. उत्तर अमेरिकेच्या इस्लामिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सय्यद सयीद असं म्हणतात, की “देवाकडून आपल्याला जी समृद्धी मिळते त्याची आठवण राहावी म्हणून आपल्यावर दुःख येतं. तसंच, दुःखामुळे आपल्याला या गोष्टीची जाणीव राहते की आपण गरिबांना मदत केली पाहिजे.”

यहुदी परंपरा मानणारे

असा विश्‍वास करतात, की एका व्यक्‍तीच्या कर्मामुळेच तिला दुःखं भोगावी लागतात. काही यहुदी लोकांचं असं म्हणणं आहे, की मेलेल्या लोकांना पुन्हा जिवंत केलं जाईल. त्यानंतर, ज्या निर्दोष लोकांनी दुःख सहन केलं त्यांना न्याय मिळवून दिला जाईल. कबाला या रहस्यमय यहुदी धर्मात पुनर्जन्माची शिकवण दिली जाते. पुनर्जन्मामुळे एका व्यक्‍तीला वारंवार आपल्या अपराधांची क्षमा मिळवण्याची संधी मिळते.

बौद्ध धर्म मानणारे

असा विचार करतात, की जोपर्यंत एका व्यक्‍तीचं चुकीचं वागणं, वाईट भावना आणि चुकीच्या इच्छा संपत नाहीत, तोपर्यंत तिचं पुनर्जन्माचं चक्र सुरूच राहतं. आणि हे दुःख तिला अनेक जन्मांपर्यंत भोगत राहावं लागू शकतं. पण बुद्धी मिळवल्यामुळे, चांगली कामं केल्यामुळे आणि मनावर ताबा मिळवल्यामुळे एका व्यक्‍तीला निर्वाण मिळू शकतं. ही अशी स्थिती आहे ज्यात दुःखाची जाणीव राहत नाही.

कन्फ्युशियन धर्म मानणारे

अ डिक्शनरी ऑफ कम्पॅरेटिव रिलिजन  यात म्हटलं आहे, कन्फ्युशियन धर्म मानणारे असा विश्‍वास करतात, की “माणसाचं अपयश आणि चुका” हेच बहुतेक दुःखांमागचं कारण आहे. त्यांचा असा विश्‍वास आहे की चांगलं जीवन जगल्यामुळे दुःख काही प्रमाणात कमी करता येतं. पण बऱ्‍याच समस्या आत्मिक शक्‍तींकडून येतात. त्यामुळे त्या माणसाच्या हाताबाहेर असतात. म्हणून माणसाने आपल्या नशिबाला धैर्याने तोंड दिलं पाहिजे.

काही आदिवासी धर्म मानणारे

असा विश्‍वास करतात, की जादूटोण्यामुळे माणसावर दुःखं येतात. ते असं मानतात की जादूटोणा करणारे एखाद्याचं भलं करू शकतात किंवा वाईट करू शकतात. वेगवेगळे विधी केल्यामुळे त्यांचा प्रभाव कमी केला जाऊ शकतो. म्हणून, जेव्हा एखादी व्यक्‍ती जादूटोण्यामुळे आजारी पडते तेव्हा तिने मंत्रतंत्र करणाऱ्‍यांकडे गेलं पाहिजे. मंत्रतंत्र करणाऱ्‍या व्यक्‍तीने दिलेल्या औषधामुळे किंवा सांगितलेल्या विधीमुळे ती बरी होऊ शकते, असंही ते मानतात.

ख्रिस्ती धर्म मानणारे

असं मानतात, की बायबलच्या उत्पत्ति पुस्तकात सांगितल्याप्रमाणे पहिल्या मानवी जोडप्याने केलेल्या पापामुळे माणसांवर दुःख येतं. पण ख्रिस्ती धर्मातल्या बऱ्‍याच पंथांनी या शिकवणीत वेगवेगळे विचार जोडले आहेत. उदाहरणार्थ, काही कॅथलिक लोक असं मानतात, की एक व्यक्‍ती देवाला आपलं दुःख अर्पित करू शकते. आणि ती व्यक्‍ती देवाला अशी विनंती करू शकते की तिच्या या अर्पणामुळे चर्चचं भलं व्हावं. किंवा यामुळे एखाद्याची संकटातून सुटका व्हावी.

आणखी जाणून घ्या

देवाच्या नजरेत सर्वच धर्म सारखे आहेत का?  हा व्हिडिओ jw.org/mr या वेबसाईटवर पाहा.