व्हिडिओ पाहण्यासाठी

कुटुंबासाठी मदत

या भागातल्या लेखांमध्ये कुटुंबासाठी बायबलमधले काही चांगले व व्यावहारिक सल्ले दिलेले आहेत. a कुटुंबासाठी असलेले आणखी लेख वाचण्यासाठी ‘वैवाहिक जीवन आणि कुटुंब’ या टॅबखाली पाहा.

a या भागामध्ये काही व्यक्‍तींची नावं बदलण्यात आली आहेत.

वैवाहिक जीवन

कदर कशी दाखवाल?

जेव्हा पती आणि पत्नी एकमेकांच्या चांगल्या गुणांवर लक्ष देऊन त्यांचं कौतुक करतात तेव्हा त्यांचं नातं घनिष्ठ होतं. विवाहसोबत्याची कदर करण्यासाठी कोणती गोष्ट तुम्हाला मदत करेल?

आनंदी विवाहासाठी: प्रेम दाखवा

काम आणि दररोजच्या जीवनातल्या ताणतणावांमुळे विवाहात एकमेकांबद्दलचं प्रेम आटू शकतं. मग हे प्रेम पुन्हा बहरू शकतं का?

एकमेकांना दिलेल्या वचनाची नेहमी आठवण ठेवा

लग्नाच्या वेळी वचन दिल्यामुळं तुमच्या पायात बेड्या पडल्या असं तुम्ही समजता की वचन देणं हे तुमच्या विवाहाची नौका स्थिर ठेवणारा नांगर आहे असा समजता?

सासूसासऱ्यांशी कसं जुळवून घ्याल?

सासूसासऱ्यांमुळे तुमच्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होऊ नये म्हणून तीन गोष्टी तुम्हाला मदत करू शकतात.

एकमेकांशी जुळवून घेणं

तुमचं आणि तुमच्या सोबत्याचं जुळतच नाही, असं तुम्हाला कधी वाटलं आहे का?

आपसांतला संवाद

समस्यांवर चर्चा कशी कराल?

पुरुष आणि स्त्रिया वेगवेगळ्या प्रकारे संवाद साधतात. त्यातील फरक जाणून घेतल्याने तुम्ही होणारा मनस्ताप टाळू शकता.

पती-पत्नी कशी करू शकतात तडजोड?

वादावादी टाळून एकत्र मिळून तोडगा काढण्यासाठी चार गोष्टी तुम्हाला मदत करू शकतात.

क्षमा का मागितली पाहिजे?

माझीच सर्व चूक नसेल तर?

मुलांचं संगोपन

घरातल्या कामांमध्ये हातभार लावण्याचं महत्त्व

तुम्ही आपल्या मुलांना घरातली कामं देण्याचं टाळता का? असं असेल तर, घरातली कामं केल्याने मुलं कशी जबाबदार बनू शकतात व आनंद मिळवू शकतात, याबद्दल जाणून घ्या.

मुलांची योग्य प्रशंसा कशी कराल?

मुलांची योग्य प्रकारे प्रशंसा केल्यानं चांगले परिणाम दिसून आले आहेत.

वयात येणाऱ्या आपल्या मुलांना मदत करणं

बायबलमधील पाच तत्त्वांमुळे, या अवघड काळातून जाणाऱ्या मुलांचा प्रवास सोपा होऊ शकतो.

मुलांना सेक्सविषयी शिक्षण द्या

मुलांना लहानपणीच बऱ्याच सेक्स सूचक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. तुम्हाला याबाबतीत काय माहीत असलं पाहिजे आणि तुम्ही तुमच्या मुलांचं संरक्षण करण्यासाठी काय करू शकता?

मुलांना स्वतःवर ताबा ठेवायला शिकवा

मुलाचा प्रत्येक हट्ट पुरवत राहिलात तर तुम्ही त्यांना पुष्कळ महत्त्वाच्या गोष्टींपासून वंचित करता.

मुलांना नम्र बनायला शिकवणं

तुमच्या मुलांचा स्वाभिमान न दुखावता त्यांना नम्र राहायला शिकवा.

तरुण

कसा कराल मोहाचा सामना?

मोहाचा सामना करता येणं हे खऱ्या स्त्री-पुरुषांचं लक्षण आहे. मोहाचा सामना करण्याचा तुमचा निर्धार आणखी मजबूत करण्यासाठी आणि मोहाला बळी पडल्यामुळं होणारा मनस्ताप टाळण्यासाठी सहा गोष्टी तुम्हाला मदत करू शकतात.

रागावर ताबा कसा मिळवाल?

बायबलवर आधारित असलेले पाच मार्ग तुम्हाला रागावर ताबा मिळवण्यास मदत करू शकतात.

एकटेपणा जाणवतो तेव्हा. . .

दिवसाला १५ सिगारेट ओढणं जसं तुमच्या शरीराला घातक आहे तसंच बऱ्याच काळापासून जाणवत असलेला एकटेपणा तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. एकटेपणा टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

कसे मिळवाल खरे मित्र?

कायम टिकणारी मैत्री विकसित करण्यासाठी चार गोष्टी तुम्हाला मदत करू शकतात.

जीवनातील बदलांना कसं सामोरं जाल?

जीवनात बदल होतच राहणार. काहींनी बदलांचा यशस्वी रीत्या कसा सामना केला ते पाहा.