व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कुटुंबासाठी मोलाचा सल्ला | तरुण

एकटेपणा जाणवतो तेव्हा. . .

एकटेपणा जाणवतो तेव्हा. . .

एक समस्या

“आम्ही खरंतर तिघीजणी मैत्रिणी होतो. पण त्यातल्या दोघी मला नेहमी सोडून बाकीची कामं करायच्या. आणि नंतर, ‘आम्ही खूप मज्जा केली’ असं सांगायच्या. एकदा मी माझ्या एका मैत्रिणीला फोन केला तर कुणी दुसरीनंच फोन घेतला आणि आम्ही बोलत होतो तेव्हा मला ह्या दोघींच्या बोलण्याचा, हसण्याचा आवाज ऐकू येत होता. यानंतरपासून मला आणखीनंच एकटंएकटं वाटू लागलं.”—मरीया. *

तुम्हाला कधी असं एकटंएकटं वाटलं आहे का? बायबलमध्ये छान सल्ला दिला आहे जो तुम्हाला मदत करू शकतो. त्याआधी आपण एकटेपणाविषयी काही गोष्टी विचारात घेऊया.

तुम्हाला माहीत आहे का?

सर्वांनाच कधी न कधी एकटेपणा जाणवतो. आणि प्रसिद्ध लोकही यातून सूटलेले नाहीत. त्यांच्या अवतीभोवती सतत लोक असतात पण ते त्यांचे खरे मित्र नसतात. यामुळं त्यांना एकटेपणा जाणवतो. तेव्हा, एखाद्याला बरेच मित्र असतील पण त्यांच्यात जर जिव्हाळ्याची मैत्री नसली तर मित्रांच्या घोळक्यातही तो एकटा असू शकतो.

एकटेपणा आरोग्यासाठी धोकादायक असू शकतो. संशोधकांनी केलेल्या १४८ सर्वेंच्या अहवालावरून हे दिसून आलं की जे समाजापासून स्वतःला वेगळं करतात त्यांचा अकाली मृत्यू होण्याची शक्यता जास्त आहे. आणखी एक धोका म्हणजे अलिप्त राहणं हे “लठ्ठपणाप्रमाणंच दोन पटीनं धोकादायक आहे” आणि “दिवसाला १५ सिगारेट ओढण्याच्या बरोबरीचं आहे.”

एकटेपणामुळं आपण कमकुवत होऊ शकतो. इतकंच नाही तर आपण कुणाबरोबरही मैत्री करण्याचा धोका आहे. अॅलन नावाचा एक तरुण म्हणतो: “जेव्हा तुम्हाला एकटेपणा जाणवतो तेव्हा इतरांनी आपल्याकडं थोडसं लक्ष द्यावं म्हणून तुम्ही काहीही करायला तयार होता. तुम्हाला असंही वाटतं की कुणीच माझ्याशी मैत्री न करण्यापेक्षा कुणीही माझ्याशी मैत्री केली तरी मला चालेल. आणि यामुळं समस्या निर्माण होऊ शकते.”

मोबाईल, टॅब किंवा इतर उपकरणं वापरून एकटेपणा दूर होत नाही. नताली नावाची एक तरुणी म्हणते: “दिवसातून मी जरी शंभर लोकांना मेसेज किंवा ई-मेल पाठवला तरी मला एकटेपणा जाणवू शकतो.” टायलर नावाच्या एका तरुणालाही असंच वाटतं. तो म्हणतो: “एखाद्याला मेसेज पाठवणं वरचा खाऊ खाल्यासारखं आहे पण समोरासमोर भेटणं हे जेवणासारखं आहे. वरचा खाऊ चटपटीत असतो पण पोटभर जेवल्यानंच समाधान मिळतं.”

तुम्ही काय करू शकता

सकारात्मक विचार करा. समजा, तुम्ही अशा एका इंटरनेट साईटवर जाता जिथं आपण आपले फोटो टाकू शकतो. तिथं तुम्ही तुमच्या मित्रांनी, त्यांच्या एका पार्टीचे फोटो टाकलेले पाहता. त्या पार्टीला त्यांनी तुम्हाला बोलवलं नव्हतं. आता तुमच्याकडं दोन पर्याय आहेत. एकतर, त्यांनी मुद्दामहून तुम्हाला बोलवलं नाही असा विचार तुम्ही करू शकता किंवा मग सकारात्मक विचार करू शकता. तुम्हाला न बोलवण्याची बरीच कारणं असू शकतात जी तुम्हाला माहीत नाहीत तर मग नकारात्मक विचार का करायचा? त्यांनी तुम्हाला पार्टीला बोलवलं नाही याचं काहीतरी चांगलं कारण असावं असा विचार करा. बऱ्याच वेळा आपल्याला परिस्थितीमुळं नव्हे तर आपल्याच चुकीच्या दृष्टिकोनामुळं एकटेपणा जाणवतो.—बायबलचं तत्त्व: नीतिसूत्रे १५:१५.

चुकीचा विचार करू नका. तुम्हाला एकटेपणा जाणवतो तेव्हा तुम्ही असा विचार कराल, ‘मला कधीच कुणी पार्टीला बोलवत नाही,’ किंवा ‘सगळे मला नेहमीच टाळतात’. पण असा विचार करून तुम्ही एकटेपणाच्या दलदलीत आणखी फसत जाता. तुमच्या मनात एक दुष्ट चक्र सुरू होतं: लोकांनी तुम्हाला वाळीत टाकलं आहे असा विचार तुम्ही करत असल्यामुळं तुम्ही स्वतःच लोकांपासून दूर राहता. त्यामुळं तुम्हाला एकटेपणा जाणवतो आणि मग परत तुम्हाला वाळीत टाकल्यासारखं वाटू लागतं.—बायबलचं तत्त्व: नीतिसूत्रे १८:१.

वयानं मोठं असलेल्या लोकांसोबत मैत्री करण्याचा प्रयत्न करा. बायबलमध्ये दावीद आणि योनाथान यांच्याबद्दल सांगितलं आहे. या दोघांची जेव्हा पहिल्यांदाच भेट झाली तेव्हा दावीद किशोरवयीन होता आणि योनाथान त्याच्याहून ३० वर्षांनी मोठा होता. त्यांच्या वयात इतका फरक असूनही ते जिवलग मित्र बनले. (१ शमुवेल १८:१) तुमच्या बाबतीतही असं होऊ शकतं. २१ वर्षांची किआरा म्हणते: “आता मला माझ्यापेक्षा वयानं मोठं असलेल्या मित्रांची किंमत कळू लागलीय. माझे काही जिवलग मित्रमैत्रिणी माझ्यापेक्षा दहाहून अधिक वर्षानं मोठी आहेत. एखाद्या गोष्टीकडं पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन, त्यांची शांत वृत्ती आणि समजूतदारपणा यांची मी मनापासून कदर करते.”—बायबलचं तत्त्व: ईयोब १२:१२.

कधीकधी एकटं राहिल्यानं फायदे होतात. काही लोक एकांतात असले तर लगेच त्यांना एकटेपणा जाणवतो. पण केवळ एकांतात असल्यानं तुम्हाला एकटं वाटू नये. येशूचं उदाहरण घ्या. त्याला लोकांसोबत बोलायला आणि त्यांच्यासोबत वेळ घालवायला आवडायचं. पण त्याला एकांतात राहण्याचेही फायदे माहीत होते. (मत्तय १४:२३; मार्क १:३५) तुम्हीही तसंच करू शकता. एकटं असल्यानं दुःखी होण्यापेक्षा तुम्हाला देवाकडून मिळालेल्या चांगल्या गोष्टींवर विचार करण्यासाठी त्या शांत वेळेचा उपयोग करा. यामुळं इतरजण तुमच्याकडं आकर्षित होतील आणि त्यांना तुमची मैत्री हवीहवीशी वाटू लागेल.नीतिसूत्रे १३:२०.▪ (g15-E 04)

^ परि. 4 या लेखातली काही नावं बदलण्यात आली आहेत.