व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ १५

ख्रिस्ती मंडळीला वडीलांची कशी मदत होते?

ख्रिस्ती मंडळीला वडीलांची कशी मदत होते?

फिनलंड

शिकवताना

मेंढपाळ भेट देताना

प्रचार कार्य करताना

आमच्या संघटनेत पगारी पाळक नसतात. त्याऐवजी, पहिल्या शतकातील मंडळ्यांप्रमाणे आज पात्र असलेल्या पुरुषांना देवाच्या मंडळीचे “पालन” करण्यासाठी पर्यवेक्षक म्हणून नेमले जाते. (प्रेषितांची कृत्ये २०:२८) आध्यात्मिक रीत्या प्रौढ असलेले हे पुरुष मंडळीत पुढाकार घेतात आणि मंडळीचे पालन करतात, पण हे “करावे लागते म्हणून नव्हे, तर देवाच्या इच्छेप्रमाणे संतोषाने” ते करतात. तसेच ते “द्रव्यलोभाने नव्हे तर उत्सुकतेने” मंडळीत कार्य करतात. (१ पेत्र ५:१-३) ते आपल्यासाठी कोणती कार्ये करतात?

ते आपली काळजी करतात आणि आपले संरक्षण करतात. वडील मंडळीतील सर्वांना योग्य मार्गदर्शन देतात व आध्यात्मिक रीत्या सुरक्षित ठेवतात. ते मंडळीत वर्चस्व गाजवत नाहीत, तर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी आपल्याला देवाकडून मिळाली आहे या जाणिवेने ते मंडळीच्या हितासाठी व आनंदासाठी कार्य करतात. (२ करिंथकर १:२४) ज्याप्रमाणे एक मेंढपाळ कळपातील प्रत्येक मेंढराची मनापासून काळजी घेतो, त्याचप्रमाणे वडील मंडळीतील प्रत्येक सदस्यात वैयक्तिक आस्था घेतात.—नीतिसूत्रे २७:२३.

ते आपल्याला देवाच्या इच्छेनुसार वागण्यास शिकवतात. दर आठवडी ख्रिस्ती सभांमध्ये वडील शिकवण्यात पुढाकार घेतात ज्यामुळे आपला विश्वास आणखी मजबूत होतो. (प्रेषितांची कृत्ये १५:३२) मंडळीसाठी मनापासून कार्य करणारे हे पुरुष आपल्यासोबत क्षेत्रात कार्य करून व आपल्याला क्षेत्र सेवेच्या वेगवेगळ्या पैलूंचे प्रशिक्षण देऊन प्रचार कार्यातही पुढाकार घेतात.

ते आपल्याला वैयक्तिक रीत्या प्रोत्साहन देतात. आपल्याला आध्यात्मिक रीत्या दृढ करण्यासाठी आणि शास्त्रवचनांतून मदत व सांत्वन देण्यासाठी अधूनमधून वडील आपल्या घरी येतात किंवा राज्य सभागृहात आपल्याशी बोलतात.—याकोब ५:१४, १५.

मंडळीतील जबाबदाऱ्यांव्यतिरिक्त, बहुतेक वडिलांचा बराच वेळ नोकरी करण्यात व कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यात जातो. आपल्यासाठी कठीण परिश्रम करणाऱ्या या बांधवांचा आपण नक्कीच आदर केला पाहिजे.—१ थेस्सलनीकाकर ५:१२, १३.

  • मंडळीतील वडिलांची काय भूमिका आहे?

  • वडील कोणकोणत्या मार्गांनी आपल्यात वैयक्तिक आस्था दाखवतात?