व्हिडिओ पाहण्यासाठी

यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांचे आयोजन कसे केले जाते?

यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांचे आयोजन कसे केले जाते?

 मंडळीतील वडील वर्ग प्रत्येक मंडळीची देखरेख करतो. जवळपास २० मंडळ्यांचे मिळून एक विभाग बनते आणि जवळपास १० विभागांचे मिळून एक प्रांत बनतो. प्रत्येक मंडळीला प्रवासी वडील वेळोवेळी भेटी देतात, या प्रवासी वडिलांना विभागीय पर्यवेक्षक असे म्हणतात.

 बऱ्‍याच वर्षांपासून यहोवाचे साक्षीदार म्हणून सेवा करत असलेल्या प्रचारकांनी मिळून बनलेले नियमन मंडळ बायबलवर आधारित मार्गदर्शन आणि सल्ले पुरवते. हे मंडळ यहोवाच्या साक्षीदारांच्या वॉरविक, न्यूयॉर्क येथे असलेल्या आंतरराष्ट्रीय कार्यालयांतून कार्य करते.—प्रेषितांची कृत्ये १५:२३-२९; १ तीमथ्य ३:१-७.