व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ २५

राज्य सभागृहे—ती का व कशी बांधली जातात?

राज्य सभागृहे—ती का व कशी बांधली जातात?

बोलिव्हिया

नाइजीरिया, पूर्वी आणि आता

ताहिती

राज्य सभागृह या नावावरूनच सूचित होते की या ठिकाणी बायबलच्या प्रमुख शिकवणीवर अर्थात देवाच्या राज्यावर भर दिला जातो. येशूनेदेखील आपल्या सेवाकार्यात याच विषयावर भर दिला.—लूक ८:१.

ती उपासनेची केंद्रस्थाने असतात. यहोवाच्या साक्षीदारांचे प्रचार कार्य राज्य सभागृहांतून पार पाडले जाते. (मत्तय २४:१४) ही राज्य सभागृहे वेगवेगळ्या आकाराची असतात व त्यांची रचनाही वेगवेगळी असते; असे असले तरी ती फार दिखाऊ किंवा अवाढव्य नसतात. एका राज्य सभागृहात सहसा एकापेक्षा अधिक मंडळ्यांच्या सभा होतात.मंडळ्यांची व प्रचारकांची वाढ लक्षात घेऊन अलीकडील काळात आम्ही हजारो (प्रती दिवशी सरासरी पाच) नवीन राज्य सभागृहे बांधली आहेत. हे कसे शक्य होते?—मत्तय १९:२६.

एका विशिष्ट फंडात जमा केलेल्या दानांकरवी ती बांधली जातात. हे दान शाखा कार्यालयाला पाठवले जाते जेणेकरून राज्य सभागृहे बांधण्यासाठी किंवा त्यांची डागडुजी करण्यासाठी हा पैसा इतर मंडळ्यांना दिला जाऊ शकतो.

निरनिराळ्या पार्श्‍वभूमीतून आलेले स्वयंसेवक त्यांचे बांधकाम करतात. अनेक देशांत, राज्य सभागृह बांधकाम गट बनवले जातात. बांधकाम सेवकांचे गट व स्वयंसेवक एका देशांतर्गत असलेल्या निरनिराळ्या मंडळ्यांमध्ये, अगदी दुर्गम भागातील मंडळ्यांमध्येही जातात आणि स्थानिक मंडळ्यांना त्यांची राज्य सभागृहे बांधण्यास मदत करतात. इतर देशांत अनुभवी साक्षीदारांना, त्यांच्या नियुक्त क्षेत्रातील राज्य सभागृहे बांधकामाची व पुनर्बांधणीची देखरेख करण्यासाठी नेमण्यात आले आहे. जेथे कोठे राज्य सभागृहांचे बांधकाम चालते तेथे खास कौशल्ये असलेले अनेक जण काम करत असले तरी तेथील बहुतेक कामे स्थानिक मंडळीतील सदस्यच करतात. यहोवाच्या आत्म्यामुळे आणि या सर्व लोकांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळेच हे मोठे कार्य शक्य होते.—स्तोत्र १२७:१; कलस्सैकर ३:२३.

  • आमच्या उपासनास्थळाला राज्य सभागृह असे का म्हटले जाते?

  • जगभरात राज्य सभागृहे बांधण्याचे काम कसे शक्य होते?