व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ५

आमच्या ख्रिस्ती सभांमध्ये तुम्हाला काय अनुभवायला मिळेल?

आमच्या ख्रिस्ती सभांमध्ये तुम्हाला काय अनुभवायला मिळेल?

अर्जेंटिना

सिएरा लियोन

बेल्जियम

मलेशिया

बऱ्याच लोकांनी धार्मिक कार्यक्रमांना जाण्याचे सोडून दिले आहे कारण तेथे त्यांना आध्यात्मिक मार्गदर्शन, मनःशांती मिळत नाही. तर मग, तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना का उपस्थित राहिले पाहिजे? तेथे तुम्हाला काय अनुभवायला मिळेल?

प्रेमळ व इतरांची काळजी करणाऱ्या लोकांमध्ये असण्याचा आनंद. पहिल्या शतकातील ख्रिस्ती, देवाची उपासना करण्यासाठी, शास्त्रवचनांचा अभ्यास करण्यासाठी आणि एकमेकांना उत्तेजन देण्यासाठी मंडळ्यांमध्ये एकत्र यायचे. (इब्री लोकांस १०:२४, २५) अशा प्रेमळ वातावरणात एकत्र आल्यामुळे त्यांना खऱ्या मित्रांच्या सहवासात अर्थात आपल्या बंधुभगिनींच्या सहवासात असल्यासारखे वाटायचे. (२ थेस्सलनीकाकर १:३; ३ योहान १४) आज आम्हीसुद्धा तेच करतो आणि खरा आनंद अनुभवतो.

बायबलची तत्त्वे लागू करण्याचा फायदा. बायबलच्या काळासारखेच आजही, स्त्री-पुरूष आणि मुले बायबलची तत्त्वे शिकण्यास मंडळीत एकत्र येतात. अनुभवी शिक्षक बायबलचा उपयोग करून त्यातील तत्त्वे रोजच्या जीवनात कशी लागू करावीत हे समजण्यास आपल्याला मदत करतात. (अनुवाद ३१:१२; नहेम्या ८:८) सभांमध्ये प्रश्नोत्तरांचा भाग हाताळला जातो, गीते गायिली जातात तेव्हा सर्व जण त्यात भाग घेऊ शकतात आणि आपला विश्वास व्यक्त करू शकतात.—इब्री लोकांस १०:२३.

देवावरील आपला विश्वास आणखी मजबूत होतो. प्रेषित पौलाने त्याच्या काळातील एका मंडळीला असे लिहिले: “तुमची भेट घेण्याची मला फार उत्कंठा आहे; . . . तुमच्या व माझ्या अशा परस्परांच्या विश्वासाच्या योगाने आपणा उभयतांस, मला तुम्हाविषयी, व तुम्हाला माझ्याविषयी उत्तेजन प्राप्त व्हावे.” (रोमकर १:११, १२) सभांमध्ये नियमितपणे आपल्या ख्रिस्ती बंधुभगिनींच्या सहवासात राहिल्यामुळे आपला विश्वास आणखी दृढ होतो आणि बायबलच्या तत्त्वांनुसार जीवन जगण्याचा आपला निर्धार आणखी मजबूत होतो.

वर सांगितलेल्या गोष्टी स्वतः अनुभवण्यास आम्ही तुम्हाला आमच्या सभेला येण्याचे आमंत्रण देतो. तेथे तुमचे मनःपूर्वक स्वागत केले जाईल. आमच्या सर्व सभांमधील प्रवेश विनामूल्य आहे आणि कोणतीही वर्गणी गोळा केली जात नाही.

  • आम्ही आमच्या सभा चालवण्यासाठी कोणाचे अनुकरण करतो?

  • ख्रिस्ती सभांना उपस्थित राहिल्यामुळे आपल्याला कोणता फायदा होऊ शकतो?