व्हिडिओ पाहण्यासाठी

कुटुंब आनंदी बनवण्यासाठी कशाची गरज आहे?

कुटुंब आनंदी बनवण्यासाठी कशाची गरज आहे?

तुम्हाला काय वाटतं . . .

  • प्रेमाची?

  • पैशाची?

  • की, आणखी कशाची?

पवित्र शास्त्र असं शिकवतं

“जे देवाचं वचन ऐकून त्याप्रमाणे वागतात तेच सुखी!”—लूक ११:२८, नवे जग भाषांतर.

या शिकवणीचा तुम्हाला काय फायदा होईल?

निखळ प्रेम.​—इफिसकर ५:२८, २९.

गाढ आदर.​—इफिसकर ५:३३.

कुटुंबात एकता.​—मार्क १०:६-९.

पवित्र शास्त्रात जे म्हटलं आहे त्यावर आपण खरंच विश्‍वास ठेवू शकतो का?

नक्कीच, याची कमीतकमी दोन कारणं आहेत:

  • कुटुंबाची सुरुवात यहोवा देवाने केली आहे.  पवित्र शास्त्र म्हणतं की यहोवा देवाने पहिल्या मानवी जोडप्याचं लग्न लावलं. (उत्पत्ती २:१८-२४) दुसऱ्‍या शब्दांत, यहोवाने कुटुंबाची सुरुवात केल्यामुळेच आज कुटुंबव्यवस्था अस्तित्वात आहे. ही गोष्ट मान्य करणं महत्त्वाचं आहे का?

    हो. हे समजण्यासाठी अशी कल्पना करा, की तुम्ही एका चविष्ट पदार्थाचा आस्वाद घेत आहात. त्यात कायकाय घातलं आहे हे माहित करून घ्यायचं असेल, तर तुम्ही कोणाला विचाराल? सहाजिकच, ज्याने तो पदार्थ बनवला त्यालाच.

    त्याचप्रमाणे, आपलं कुटुंब आनंदी बनवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे हे माहित करून घ्यायचं असेल, तर कुटुंबाची सुरुवात करणाऱ्‍या यहोवा देवालाच आपण ते विचारलं पाहिजे.

  • यहोवा देवाला तुमची काळजी आहे.  यहोवाने त्याच्या पवित्र शास्त्रात दिलेल्या सल्ल्याचं कुटुंबांनी पालन केल्यामुळे त्यांना नक्कीच फायदा होईल. का? “कारण त्याला तुमची काळजी आहे.” (१ पेत्र ५:६, ७) यहोवा नेहमी आपल्या भल्याचा विचार करतो आणि त्याचा सल्ला नेहमीच कामी येतो!—नीतिवचनं ३:५, ६; यशया ४८:१७, १८.

थोडा विचार करा

तुम्ही एक चांगले पती, पत्नी किंवा आईवडील कसं बनू शकता?

याचं उत्तर पवित्र शास्त्रातल्या इफिसकर ५:१, २ आणि कलस्सैकर ३:१८-२१ या वचनांत मिळेल.