व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आधुनिक जीवनासाठी प्राचीन सल्ला

मोठ्या मनानं माफ करा

मोठ्या मनानं माफ करा

बायबलमधील तत्त्व: “कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपसात क्षमा करा; प्रभूने [यहोवाने] तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही करा.”—कलस्सैकर ३:१३.

क्षमा करण्याचा काय अर्थ होतो? बायबलमध्ये पापाची तुलना कर्जाशी आणि क्षमा करण्याची तुलना ते कर्ज माफ करण्याशी करण्यात आली आहे. (लूक ११:४) बायबलमध्ये ‘क्षमा’ असे ज्याचे भाषांतर करण्यात आले आहे त्या ग्रीक शब्दाचा अर्थ, “ज्याला कर्ज देण्यात आले आहे त्याच्याकडे परतफेडीची मागणी न करता ते माफ करणं” असा होतो, असं एका पुस्तकात म्हटलं आहे. त्यामुळं आपण जेव्हा आपलं मन दुखावणाऱ्याला माफ करतो तेव्हा आपण कशाचीही अपेक्षा न करता मोठ्या मनानं त्याला क्षमा करतो. क्षमा करण्याची तयारी दाखवून आपण, आपलं मन दुखावलेल्या व्यक्तीचं चुकीचं वागणं खपवून घेत नसतो. किंवा, त्याच्या वागण्यामुळं आपल्याला झालेल्या दुःखाची तीव्रता कमी होत नसते. तर, मनात राग बाळगण्याचं रास्त कारण असलं तरी आपण तसं करत नाही; आपण तिला माफ करतो.

पण आजच्या दिवसांत असं करणं व्यावहारिक आहे का? आपण अपरिपूर्ण असल्यामुळं आपल्या हातून नेहमीच चुका होतात. (रोमकर ३:२३) त्यामुळं इतरांना क्षमा करून आपण सुज्ञता दाखवतो कारण आज नाही तर उद्या आपल्यालाही क्षमेची गरज भासू शकते. शिवाय, इतरांना आपण माफ करतो तेव्हा आपल्यालासुद्धा फायदाच होतो. कोणता फायदा?

माफ करण्यास तयार न होता मनात राग बाळगून आपण खरं तर स्वतःलाच इजा करत असतो. मनात राग खदखदत ठेवल्यामुळं, आपण जीवनाचा पुरेपूर आनंद लुटू शकत नाही आणि आपलं जीवन निरस होतं. यामुळं आपल्या आरोग्यालादेखील धोका संभवू शकतो. मनात राग खदखदत ठेवणं व शत्रुत्वाच्या भावना जोपासत राहणं हे हृदयविकाराला आमंत्रण आहे, असा रिपोर्ट द हिंदू नावाच्या एका दैनिकात देण्यात आला आहे.

पण तेच जर आपण माफ केलं तर त्याचे अनेक फायदे आहेत. इतरांना मोठ्या मनानं क्षमा केल्यानं आपण आपल्यातील एकी व शांती टिकवून ठेवतो. यामुळं आपापसातील नातेसंबंध टिकून राहतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आपण देवाचं अनुकरण करणारे आहोत हे दाखवून देतो. कारण, पश्‍चात्ताप करणाऱ्या पापी लोकांना तो क्षमा करतो व इतरांना क्षमा केली पाहिजे अशी तो आपल्याकडून अपेक्षा करतो.—मार्क ११:२५; इफिसकर ४:३२; ५:१. (w15-E 10/01)