व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मुख्य विषय | प्रार्थना केल्यानं काही फायदा होतो का?

देव आपल्याला प्रार्थना करण्यास का सांगतो?

देव आपल्याला प्रार्थना करण्यास का सांगतो?

देवाला तुमच्याशी मैत्री करायची आहे.

एक चांगला नातेसंबंध जोडण्यासाठी मित्र एकमेकांशी संवाद साधत असतात. त्याच प्रकारे, देव आपल्याला त्याच्यासोबत संवाद साधण्याचं उत्तेजन देऊन जणू काय मैत्रीचा हात पुढं करतो. तो म्हणतो: “तुम्ही माझा धावा कराल, तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल व मी तुमचे ऐकेन.” (यिर्मया २९:१२) जसजसं तुम्ही प्रार्थनेत देवाशी बोलाल, तसतसं तुम्ही देवाजवळ याल आणि तोसुद्धा तुमच्या जवळ येईल. (याकोब ४:८) बायबलमध्ये असं आश्वासन दिलं आहे: “जे कोणी त्याचा धावा करतात . . . त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे.” (स्तोत्र १४५:१८) आपण त्याला जितकी प्रार्थना करत राहू, तितकी त्याच्यासोबतची आपली मैत्री बहरत जाईल.

“जे कोणी त्याचा धावा करतात . . . त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे.”—स्तोत्र १४५:१८

देवाला तुमची मदत करायची आहे.

येशूनं म्हटलं: “आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्याला धोंडा देईल आणि मासा मागितला तर त्याला साप देईल, असा तुमच्यात कोण माणूस आहे? . . . आपल्या मुलांबाळांना चांगल्या देणग्या देणे तुम्हाला समजते, तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेषकरून चांगल्या देणग्या देईल?” (मत्तय ७:९-११) देव तुम्हाला प्रार्थना करण्यास सांगतो कारण तो “तुमची काळजी घेतो” आणि त्याला तुमची मदत करायची आहे. (१ पेत्र ५:७) तुमच्या काही समस्या असतील तर तुम्ही त्याच्याकडं मन मोकळं करावं, असंही तो सांगतो. बायबलमध्ये म्हटलं आहे: “कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा.”—फिलिप्पैकर ४:६.

मानवांना आध्यात्मिक भूक असते.

मानव स्वभावाचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांच्या लक्षात आलं आहे, की कोट्यवधी लोकांना प्रार्थना करण्याची गरज भासते. या लोकांमध्ये नास्तिक आणि अज्ञेयवादी (देवाच्या अस्तित्वाबद्दल निश्‍चित मत नसणारी व्यक्ती) व्यक्तींचासुद्धा समावेश आहे. * हे या गोष्टीचा पुरावा देते, की मानवांना देवासोबत मैत्री जोडण्याच्या इच्छेसह निर्माण करण्यात आलं होतं. ही इच्छा ओळखणारी व्यक्ती “धन्य” आहे असं येशूनं म्हटलं. (मत्तय ५:३) देवासोबत नेहमी संवाद साधून आपण ही इच्छा पूर्ण करत असतो.

आपण देवाला प्रार्थना केली तर आपल्याला काय फायदा होऊ शकतो? (w15-E 10/01)

^ परि. 8 प्यू रिसर्च सेंटरनं २०१२ मध्ये घेतलेल्या एका सर्व्हेनुसार, अमेरिकेत राहणाऱ्या ११ टक्के नास्तिक/अज्ञेयवादी व्यक्ती महिन्यातून किमान एकदा तरी प्रार्थना करतात.