व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

उत्क्रांती की निर्मिती?

मांजरीच्या मिशा

मांजरीच्या मिशा

मांजरी सहसा रात्रीचं फिरतात. त्यांच्या मिशांमुळं ते जवळपासच्या वस्तु आणि शिकार खासकरून अंधार पडल्यावरही ओळखू शकतात.

तुम्हाला माहीत होतं का? मांजरीच्या मिशा अतिशय संवेदनशील असतात. हवेतील अगदी किंचित हालचालदेखील त्यांना जाणवते. आणि जवळपासच्या वस्तु अगदी अंधारातही मांजरी ओळखू शकतात.

मांजरीच्या मिशांना हवेतील दाब ओळखता येत असल्यामुळं, एखाद्या वस्तुची किंवा ती शिकार करत असलेल्या प्राण्याची जागा व हालचाल मांजरी अचूक समजू शकतात. मांजरी लहानशा फटीतूनही सहजपणे जाऊ शकतात. त्यांच्या मिशांमुळं त्या या लहानशा जागेच्या रुंदीचा अंदाज घेऊ शकतात. एन्सायक्लोपिडिआ ब्रिटानिका या विश्वकोशात असं म्हटलं आहे, की मांजरीच्या मिशांचा त्यांना किती फायदा होतो हे अजून पूर्णपणे समजलेलं नाही. एक गोष्ट मात्र आपल्याला माहीत आहे. ती म्हणजे जर मांजरीच्या मिशा कापण्यात आल्या तर, त्या पुन्हा वाढेपर्यंत ती एक प्रकारे अपंगच होते.

शास्त्रज्ज्ञदेखील मांजरीच्या मिशांसारखं कार्य करणारे रोबोट्स तयार करत आहेत. या रोबोट्समध्ये संवेदक असतील ज्यांमुळं ते अडथळे असतानाही चालू शकतील. आधुनिक रोबोट्समध्ये तसंच इतर काही उपकरणांमध्ये मांजरीच्या मिशांप्रमाणं कार्य करणाऱ्या संवेदकांचा भविष्यात आणखी जास्त उपयोग केला जाईल, असं बर्क्ले येथील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियातील अली जावी नावाच्या एका प्राध्यापकानं म्हटलं.

तुम्हाला काय वाटतं? मांजरीची मिशी उत्क्रांतीनं अस्तित्वात आली की कुणीतरी तिची रचना केली? ▪ (g15-E 04)