व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

विवाहसोबती विश्‍वासघात करतो तेव्हा . . .

विवाहसोबती विश्‍वासघात करतो तेव्हा . . .

स्पेन देशात राहणारी मारिया म्हणते: “माझ्या पतीने जेव्हा मला सांगितलं की त्याच्या जीवनात एक तरुण स्त्री आलीये तेव्हा मला कुठेतरी जाऊन जीव द्यावासा वाटला. माझ्यावर घोर अन्याय झाला आहे असं मला वाटलं. आणि खासकरून मी त्याच्यासाठी जे त्याग केले होते ते आठवल्यावर तर मला आणखीनच दुःख झालं.”

स्पेन देशात राहणारा बिल म्हणतो: “माझी पत्नी जेव्हा मला अचानक सोडून गेली, तेव्हा वाटलं जणू माझा श्‍वासच थांबला! आमची स्वप्नं, आशा आणि योजना यांचा एका झटक्यात चुराडा झाला. त्यानंतर, काही दिवस मला वाटायचं की मी आता सावरलोय. पण मग दुसऱ्‍याच क्षणी मी पुन्हा दुःखाच्या खोल दरीत कोसळायचो.”

विवाहसोबत्याने केलेल्या विश्‍वासघातामुळे जीवन उद्ध्‌वस्त होतं. हे खरं आहे, की काही पती-पत्नी पश्‍चात्ताप दाखवलेल्या आपल्या सोबत्याला माफ करू शकतात आणि तुटलेलं नातं पुन्हा जोडू शकतात. * पती-पत्नी विवाहबंधनात राहो अथवा न राहो पण निर्दोष सोबत्याच्या मनावर झालेल्या आघातामुळे त्याला सतत वेदना तर सोसाव्या लागतातच. अशा दुःखद भावनांचा निर्दोष सोबती कशा प्रकारे सामना करू शकतो?

मदतदायी ठरणारी बायबलमधली वचनं

बऱ्‍याच निर्दोष सोबत्यांच्या मनावर आघात झाला असला तरी शास्त्रवचनांद्वारे त्यांना सांत्वन मिळालं आहे. देव त्यांचे अश्रु पाहू शकतो आणि दुःखही समजू शकतो हे त्यांना माहीत झालं आहे.​—मलाखी २:१३-१६.

“माझे मन अनेक चिंतांनी व्यग्र होते तेव्हा तुझ्यापासून लाभणारे सांत्वन माझ्या जिवाचे समाधान करते.”​स्तोत्र ९४:१९.

बिल म्हणतो: “हे वचन वाचल्यावर यहोवा मला अशा एका प्रेमळ पित्यासारखा वाटला जो माझ्या जखमांवर अलगदपणे फुंकर घालतो.”

“दयावंताशी तू दयेने वागतोस.”​स्तोत्र १८:२५.

कार्मनच्या पतीचे बऱ्‍याच महिन्यांपासून विवाहबाह्‍य प्रेमसंबंध होते. ती म्हणते: “माझा पती विश्‍वासू नव्हता पण माझा देव यहोवा विश्‍वासू आहे आणि तो मला कधीच सोडणार नाही.”

“कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका. तर, . . . प्रार्थना व याचना करा आणि आपल्या विनंत्या देवाला कळवा; म्हणजे, सर्व समजशक्‍तीच्या पलीकडे असलेली देवाची शांती ख्रिस्त येशूद्वारे तुमच्या मनाचे व बुद्धीचे रक्षण करेल.”​फिलिप्पैकर ४:६, ७.

साशा म्हणते: “मी हे वचन वारंवार वाचत राहिले. मी जितक्या जास्त वेळा देवाला प्रार्थना केली तितक्या वेळा देवाने मला मनःशांती दिली.”

वर उल्लेख केलेल्या सर्वांना आपल्या जीवनाच्या एका टप्प्यावर येऊन आपला जीव नकोसा झाला होता. पण त्यांनी यहोवा देवावर भरवसा ठेवला आणि त्याच्या वचनांद्वारे त्यांना बळ मिळालं. बिल याबद्दल असं म्हणतो: “माझ्या जीवनात काहीच उरलं नाही असं मला वाटलं, पण देवावर असलेल्या विश्‍वासामुळे माझ्या जीवनाला अर्थ लाभला आहे. मी काही काळासाठी ‘काळोख्या दरीतून’ जात होतो तरी त्या वेळी यहोवा देव माझ्यासोबत होता.”​—स्तोत्र २३:४.

^ पश्‍चात्ताप दाखवणाऱ्‍या सोबत्याला माफ करायचं की नाही, याबद्दल २२ एप्रिल १९९९ अवेक! यात “व्हेन अ मेट इज अनफेथफूल” ही शृंखला पाहा.