व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

धडा ०२

बायबल आपल्याला एक आशा देतं

बायबल आपल्याला एक आशा देतं

आज संपूर्ण जगात लोकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. यामुळे ते खूप दुःखी आणि निराश होतात. तुम्ही कधी अशा परिस्थितीतून गेला आहात का? कदाचित तुम्ही आजारी असाल किंवा तुमच्या जवळच्या व्यक्‍तीचा मृत्यू झाला असेल. आणि यामुळे तुम्ही विचार करत असाल, की ‘चांगले दिवस कधी येतील का?’ बायबल आपल्याला या प्रश्‍नाचं उत्तर देतं आणि त्यामुळे आपल्याला दिलासा मिळतो.

१. बायबल आपल्याला कोणती आशा देतं?

आज जगात इतक्या समस्या का आहेत, याचं कारण बायबलमध्ये सांगितलंय. आणि यासोबतच त्यात एक आनंदाची गोष्टही सांगितली आहे. ती म्हणजे, या सगळ्या समस्या फक्‍त थोड्या काळासाठी आहेत आणि लवकरच त्या काढून टाकल्या जातील. पुढे काय होणार आहे याबद्दल बायबलमध्ये जे सांगितलंय, त्यामुळे तुम्हाला एक “चांगलं भविष्य आणि आशा” मिळेल. (यिर्मया २९:११, १२ वाचा.) या आशेमुळे आपल्याला सध्याच्या समस्यांचा सामना करायला आणि आनंदी राहायला मदत मिळते. आणि भविष्यातही आपण कायम आनंदी राहू याची खातरी मिळते.

२. बायबलमध्ये भविष्याबद्दल काय सांगितलंय?

बायबलमध्ये सांगितलंय की भविष्यात एक असा काळ येईल, जेव्हा “कोणीही मरणार नाही, कोणीही शोक करणार नाही किंवा रडणार नाही आणि कोणतंच दुःख राहणार नाही.” (प्रकटीकरण २१:४ वाचा.) आज गरिबी, अन्याय, आजारपण आणि मृत्यूमुळे लोक खूप निराश झाले आहेत. पण लवकरच या समस्या निघून जातील. बायबल सांगतं की मानव पृथ्वीवर एका नंदनवनात, म्हणजेच एका सुंदर परिस्थितीत कायम आनंदाने राहतील.

३. बायबलमध्ये दिलेल्या आशेवर तुम्ही आपला भरवसा कसा वाढवू शकता?

चांगल्या गोष्टी घडतील अशी बऱ्‍याच लोकांना आशा असली, तरी या गोष्टी खरंच घडतील की नाही याची त्यांना खातरी नसते. पण बायबलमध्ये जे सांगितलंय ते नक्की पूर्ण होईल यावर तुम्ही भरवसा ठेवू शकता. आणि हा भरवसा वाढवण्यासाठी तुम्ही “शास्त्रवचनांचं [बायबलचं] काळजीपूर्वक परीक्षण” केलं पाहिजे. (प्रेषितांची कार्यं १७:११) तुम्ही बायबलचा अभ्यास कराल, तेव्हा स्वतःच ठरवू शकाल की भविष्याबद्दल त्यात जे सांगितलंय, त्यावर विश्‍वास ठेवावा की नाही.

आणखी जाणून घेऊ या

बायबलमध्ये भविष्यात कोणत्या गोष्टी घडण्याचं वचन दिलंय? आणि आज या आशेमुळे लोकांना कशी मदत होत आहे? यावर विचार करू या.

४. बायबल वचन देतं की आपण चांगल्या परिस्थितीत कायम जगू

भविष्यात लवकरच कायकाय होणार आहे याबद्दल बायबलमध्ये जे सांगितलंय, ते खाली दिलेल्या चौकटींमध्ये पाहा. तुम्हाला यांपैकी कोणते आशीर्वाद सगळ्यात जास्त आवडले? आणि का?

त्या आशीर्वादांसोबत दिलेली वचनं वाचा आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • ही वचनं वाचल्यावर तुम्हाला दिलासा मिळाला का? तुमच्या नातेवाइकांना आणि जवळच्या लोकांनाही यांमुळे दिलासा मिळेल, असं तुम्हाला वाटतं का?

अशा जगाची कल्पना करा, जिथे . . .

या गोष्टी नसतील:

हे आशीर्वाद मिळतील:

  • मरण पावलेल्या जवळच्या लोकांना याच पृथ्वीवर पुन्हा भेटता येईल.​—योहान ५:२८, २९.

५. बायबलमधली आशा तुमचं जीवन बदलू शकते

आज ज्या वाईट गोष्टी होत आहेत, त्या पाहून बरेच लोक निराश होतात आणि त्यांना रागही येतो. आणि ही परिस्थिती सुधारण्यासाठी काही जण भरपूर प्रयत्नही करतात. पण बायबलमध्ये दिलेल्या आशेमुळे लोकांना आज कशी मदत होत आहे ते पाहा. व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा.

  • रफीकाला कोणता अन्याय पाहून वाईट वाटायचं?

  • अन्याय दूर झाला नाही, तरीपण रफीकाला बायबलमुळे कशी मदत झाली?

बायबलमध्ये भविष्याबद्दल जी आशा दिली आहे, ती आपल्याला निराशेचा सामना करायला आणि समस्या असतानाही आनंदी राहायला मदत करते. नीतिवचनं १७:२२ आणि रोमकर १२:१२ वाचा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • बायबलमध्ये दिलेल्या आशेमुळे तुमचं जीवन बदलू शकेल असं तुम्हाला वाटतं का? आणि तुम्हाला असं का वाटतं?

काही जण म्हणतात: “बायबलमध्ये भविष्याबद्दल जे सांगितलंय ते तर खूप छान आहे, पण ते खरं होऊ शकत नाही.”

  • हे ठरवण्याआधी आपण पुरावा का तपासून पाहिला पाहिजे?

थोडक्यात

बायबल आपल्याला एक आशा देतं. भविष्यात कोणत्याही समस्या राहणार नाहीत, असं वचन ते देतं. या आशेमुळे आपल्याला आजच्या समस्यांचा सामना करायला मदत होते.

उजळणी

  • आज आपल्याला एका आशेची गरज का आहे?

  • बायबल भविष्याबद्दल काय सांगतं?

  • भविष्यासाठी आशा मिळाल्यामुळे आजही तुम्हाला कशी मदत होऊ शकते?

ध्येय

हेसुद्धा पाहा

आशा ठेवल्यामुळे कोणते फायदे होतात हे जाणून घ्या.

“हमें उम्मीद कहाँ से मिल सकती है?” (सजग होइए!, २२ अप्रैल, २००४)

गंभीर आजारपणात भविष्याबद्दलच्या आशेमुळे कशी मदत होते हे जाणून घ्या.

“गंभीर आजारपण—बायबल काही मदत करू शकेल का?” (वेबसाईटवरचा लेख)

हा संगीत व्हिडिओ पाहताना, तुम्ही आपल्या कुटुंबासोबत भविष्यातल्या नंदनवनात आनंदाने राहत आहात अशी कल्पना करा.

स्वप्नं खरी होतील सारी तेव्हा!  (३:३७)

बायबलमधल्या आशेबद्दल समजल्यावर एका सामाजिक कार्यकर्त्याचं जीवन कसं बदललं हे वाचा.

“मी जग बदलायला निघालो होतो” (ऑनलाईन लेख)