व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

धडा ०४

देव कोण आहे?

देव कोण आहे?

सुरुवातीपासूनच मानव वेगवेगळ्या देवीदेवतांची भक्‍ती करत आले आहेत. पण, बायबल अशा एका देवाबद्दल सांगतं जो “इतर सर्व देवांपेक्षा महान आहे.” (२ इतिहास २:५) तो कोण आहे? आणि तो सर्वात महान आहे असं का म्हणता येईल? त्या देवाची अशी इच्छा आहे, की तुम्हीही त्याला जाणून घ्यावं. तो तुम्हाला स्वतःची ओळख कशी करून देतो, हे या धड्यात पाहा.

१. देवाचं नाव काय आहे, आणि आपण ते जाणून घ्यावं अशी त्याची इच्छा आहे, हे कशावरून कळतं?

बायबलमध्ये देव स्वतः आपल्याला त्याची ओळख करून देतो. तो म्हणतो, “मी यहोवा आहे. हे माझं नाव आहे.” (यशया ४२:५, ८ वाचा.) “यहोवा” हे हिब्रू भाषेतल्या एका नावाचं भाषांतर आहे. बऱ्‍याच विद्वानांच्या मते या नावाचा अर्थ, “तो व्हायला लावतो” असा आहे. यहोवाची इच्छा आहे की आपल्याला त्याचं नाव माहीत असावं. (निर्गम ३:१५) आपण असं खातरीने का म्हणू शकतो? कारण बायबलमध्ये ७,००० पेक्षा जास्त वेळा त्याचं नाव दिलंय. a बायबल सांगतं, की “वर आकाशात आणि खाली पृथ्वीवर” यहोवा हाच खरा देव आहे.​—अनुवाद ४:३९.

२. बायबल आपल्याला यहोवाबद्दल काय सांगतं?

मानव बऱ्‍याच देवीदेवतांची भक्‍ती करतात. पण बायबल सांगतं की यहोवा हा एकच खरा देव आहे. असं का म्हणता येईल? याची बरीच कारणं आहेत. पहिलं म्हणजे, यहोवाचा अधिकार सगळ्यात मोठा आहे. म्हणजेच “या संपूर्ण पृथ्वीवर फक्‍त [तोच] सर्वोच्च देव” आहे. (स्तोत्र ८३:१८ वाचा.) तसंच, तो “सर्वशक्‍तिमान” आहे. याचा अर्थ, त्याला जे काही करायची इच्छा आहे, ते करण्याची ताकद त्याच्याजवळ आहे. शिवाय, त्याने “सर्व गोष्टी निर्माण केल्या.” हे विश्‍व आणि पृथ्वीवर जे काही आहे, ते त्यानेच बनवलं. (प्रकटीकरण ४:८, ११) आणि फक्‍त यहोवाच असा आहे, ज्याला सुरुवात नाही आणि अंतही नाही.​—स्तोत्र ९०:२.

आणखी जाणून घेऊ या

देवाचं नाव आणि त्याच्या पदव्या (उपाधी), यांत कोणता फरक आहे हे समजून घेऊ या. त्यानंतर, त्याने त्याचं नाव आपल्याला का आणि कशा प्रकारे कळवलं, हे पाहू या.

३. देवाच्या बऱ्‍याच पदव्या आहेत, पण नाव फक्‍त एकच आहे

पदवी आणि नाव यांत कोणता फरक असतो, हे जाणून घेण्यासाठी, व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नावर चर्चा करा.

  • “प्रभू” किंवा “देव” यासारख्या पदवीत आणि नावात काय फरक आहे?

बायबल सांगतं की लोक बऱ्‍याच देवांची आणि प्रभूंची उपासना करतात. स्तोत्र १३६:१-३ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • “देवांचा देव” आणि “प्रभूंचा प्रभू” कोण आहे?

४. यहोवाची इच्छा आहे की आपण त्याचं नाव जाणून घ्यावं आणि ते वापरावं

आपण यहोवाचं नाव जाणून घ्यावं असं त्याला वाटतं, हे कशावरून दिसून येतं? व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा.

  • लोकांना आपलं नाव कळावं अशी यहोवाची इच्छा आहे का? तुम्हाला असं का वाटतं?

लोकांनी आपलं नाव वापरावं अशी यहोवाची इच्छा आहे. रोमकर १०:१३ वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • यहोवा हे देवाचं नाव वापरणं इतकं महत्त्वाचं का आहे?

  • कोणी तुमचं नाव आठवणीत ठेवतं आणि तुम्हाला नावाने हाक मारतं, तेव्हा तुम्हाला कसं वाटतं?

  • आपण यहोवाचं नाव वापरतो तेव्हा त्याला कसं वाटतं?

५. यहोवाची इच्छा आहे की तुम्ही त्याच्याशी एक जवळचं नातं जोडावं

कंबोडिया देशातल्या सोतेन नावाच्या स्त्रीला देवाचं नाव कळल्यावर इतका आनंद झाला, की ती म्हणते, “त्यापेक्षा मोठा कोणताच आनंद नाही.” व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नावर चर्चा करा.

  • देवाचं नाव समजल्यावर सोतेनचं जीवन कसं बदललं?

तुम्ही कोणाशी मैत्री करता, तेव्हा सगळ्यात आधी तुम्ही त्याचं नाव जाणून घेता. याकोब ४:८क वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • या वचनात यहोवा तुम्हाला काय करायचं प्रोत्साहन देतो?

  • देवाचं नाव जाणून घेतल्यामुळे आणि ते वापरल्यामुळे तुम्हाला त्याच्यासोबत जवळचं नातं जोडायला कशी मदत होईल?

काही जण म्हणतात: “देव तर शेवटी एकच आहे, मग त्याला कोणत्याही नावाने हाक मारली तरी काय फरक पडतो?”

  • देवाचं नाव यहोवा आहे हे तुम्ही मानता का?

  • आपण देवाचं नाव वापरावं अशी त्याचीच इच्छा आहे, हे तुम्ही एखाद्याला कसं समजावून सांगाल?

थोडक्यात

देवाचं नाव यहोवा आहे. तो एकच खरा देव आहे. त्याची इच्छा आहे, की आपण त्याचं नाव जाणून घ्यावं आणि वापरावं. यामुळे आपण त्याच्याशी जवळचं नातं जोडू शकतो.

उजळणी

  • आज लोक ज्या देवीदेवतांची भक्‍ती करतात, त्यांच्यापेक्षा यहोवा कसा वेगळा आहे?

  • आपण देवाचं नाव का वापरलं पाहिजे?

  • आपण यहोवाशी जवळचं नातं जोडावं अशी त्याचीच इच्छा आहे, हे कशावरून कळतं?

ध्येय

हेसुद्धा पाहा

देव अस्तित्वात आहे याची खातरी पटवून देणारी पाच कारणं पाहा.

“देव खरंच आहे का?” (वेबसाईटवरचा लेख)

देवाला सुरुवात नाही असं का म्हणता येईल, हे जाणून घ्या.

“देवाला कोणी बनवले?” (टेहळणी बुरूज, १ ऑक्टोबर, २०१४)

देवाच्या नावाचा मूळ उच्चार माहीत नसला, तरी आपण ते का वापरलं पाहिजे हे जाणून घ्या.

“यहोवा कौन है?” (वेबसाईटवरचा लेख)

आपण देवाला कशी हाक मारतो, याने काही फरक पडतो का? देवाला एकच नाव आहे असं आपण का म्हणू शकतो हे पाहा.

“परमेश्‍वर के कितने नाम है?” (वेबसाईटवरचा लेख)

a देवाच्या नावाचा काय अर्थ होतो आणि बायबलच्या काही भाषांतरांतून हे नाव का काढून टाकण्यात आलंय, याबद्दल जास्त माहितीसाठी पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर  यातला अतिरिक्‍त लेख क४ पाहा.