व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जगावर एक नजर

मध्यपूर्व देशांतील काही लक्षवेधक गोष्टी

मध्यपूर्व देशांतील काही लक्षवेधक गोष्टी

मध्यपूर्वेतील देश हे, जगातील सर्वात जुन्या संस्कृतींपैकी एक आहेत. त्यामुळं तिथं उत्खनन करताना पुरातन वसतूंचा खजिनाच सापडतो.

वाईन तयार करणारे कनानी लोक

२०१३ साली इझरायलमध्ये उत्खनन करणाऱ्यांना ३,७०० वर्षांपूर्वीचं एक भलं मोठं कोठार सापडलं. वाईनचा साठा करण्यासाठी कनानी लोकांनी ते तयार केलं होतं. या कोठारात ४० मोठे रांजण होते. या रांजणांत ३,००० वाईनच्या बाटल्या भरतील इतकी वाईन मावू शकत होती. उत्खनन करणाऱ्यांपैकी एकानं त्या रांजणातील गाळाचं परीक्षण केल्यानंतर म्हटलं, की कनानी लोक खूप काळजीपूर्वक रीतीनं वाईन बनवायचे. तो पुढं म्हणतो: “असं दिसतं, की प्रत्येक रांजणातील वाईन अगदी काटेकोरपणे एकाच पद्धतीनुसार बनवली होती.”

तुम्हाला माहीत होतं का? प्राचीन इस्राएलमध्ये ‘उत्तम द्राक्षारस’ किंवा वाईन बनवली जायची व मोठ्या रांजणांमध्ये साठवली जायची, असा उल्लेख बायबलमध्ये आढळतो.—गीतरत्न ७:९; यिर्मया १३:१२.

वाढती लोकसंख्या

द गार्डियन नावाच्या एका वृत्तापत्रातील बातमीनुसार, ईजिप्टमध्ये २०१० च्या तुलनेत २०१२ मध्ये ५,६०,००० जास्त मुलं जन्माला आली. “ईजिप्टच्या इतिहासात ही लोकसंख्येतील सर्वात मोठी वाढ आहे,” असं ईजिप्शियन सेंटर फॉर पब्लिक ओपिनिअन रिसर्चचे मागेद ओस्मान म्हणतात. याच प्रमाणात लोकसंख्या वाढत गेली तर ईजिप्टमध्ये अन्न, पाणी आणि ऊर्जा यांची आणखी जास्त प्रमाणात टंचाई भासेल.

तुम्हाला माहीत होतं का? एका ठराविक मर्यादेपर्यंत पृथ्वी माणसांनी भरावी आणि त्यावर असलेल्या सर्व तरतुदींचा आनंद घ्यावा असा देवाचा उद्देश आहे, असं बायबलमध्ये म्हटलं आहे.—उत्पत्ति १:२८; स्तोत्र ७२:१६.

लपवलेली नाणी सापडली

इस्राएलच्या एका महामार्गाजवळ उत्खनन करताना कास्याची १०० पेक्षा जास्त नाणी सापडली. या नाण्यांवर “चवथं वर्ष” असं कोरलं होतं. चवथं वर्ष हे इ.स. ६९-७० या काळादरम्यान यहूदी लोकांनी रोमन साम्राज्याविरूद्ध केलेल्या विद्रोहाला सूचित करतं. या विद्रोहामुळं जेरुसलेमचा नाश झाला होता. उत्खननाची देखरेख करणारे पाब्लो बेटझेर यांनी म्हटलं, “ज्यानं कुणी ही नाणी लपवली होती त्याला वाटलं असावं की रोमन सैन्याकडून जेरुसलेमचा नाश पक्का असल्यामुळं आपण ती नाणी या ठिकाणी पुरून ठेवू या आणि परिस्थिती शांत झाल्यावर ती परत मिळवू या.”

तुम्हाला माहीत होतं का? रोमन सैनिक जेरुसलेमला घेरतील अशी भविष्यवाणी येशूनं इ.स. ३३ मध्ये केली होती. जेव्हा असं होईल तेव्हा शिष्यांनी डोंगरात पळून जावं असं त्यानं त्यांना आर्जवलं.—लूक २१:२०-२४. (g15-E 09)