व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तिसरी गोष्ट

हार न मानता पुढे वाटचाल कशी करावी?

हार न मानता पुढे वाटचाल कशी करावी?

हार न मानता पुढे वाटचाल करणं म्हणजे काय?

हार न मानणारी एक व्यक्‍ती जीवनात येणाऱ्‍या वाईट प्रसंगातून सहजपणे सावरते. ही गोष्ट एक व्यक्‍ती आपल्या अनुभवाने शिकते. लहान मूल चालायला शिकण्यापूर्वी असंख्य वेळा पडतं, त्याच प्रकारे जीवनात यशस्वी होण्यासाठी एका व्यक्‍तीला कधीकधी समस्यांचा सामना करावा लागतो.

हार न मानता पुढे वाटचाल करणं महत्त्वाचं का आहे?

काही मुलांना अपयश येतं, कठीण परिस्थितींचा सामना करावा लागतो किंवा कोणी त्यांची टीका करतं तेव्हा ते निराश होतात. काही तर पूर्णपणे हार मानतात. पण त्यांना पुढे दिलेल्या गोष्टी समजून घेणं गरजेच्या आहेत:

  • आपण केलेल्या सर्व गोष्टीत आपल्याला यश मिळेलच असं नसतं.—याकोब ३:२.

  • प्रत्येकाला जीवनात कधी ना कधी कठीण परिस्थितींचा सामना करावा लागतो.—उपदेशक ९:११.

  • कोणीतरी आपली चूक दाखवतं तेव्हा आपल्याला शिकायला मदत होते.—नीतिसूत्रे ९:९.

हार न मानण्याची वृत्ती असल्यामुळे तुमच्या मुलाला जीवनातल्या आव्हानांचा आत्मविश्‍वासाने सामना करता येईल.

मुलांना हार न मानता पुढे वाटचाल करण्यासाठी कसं शिकवावं?

अपयश येतं तेव्हा . . .

बायबल तत्त्व: “धार्मिक सात वेळा पडला तरी पुनः उठतो.”—नीतिसूत्रे २४:१६.

समस्या गंभीर आहे की नाही हे ओळखण्यासाठी तुमच्या मुलांना मदत करा. उदाहरणार्थ, तुमचा मुलगा अमुक एका परीक्षेत नापास झाला असेल तेव्हा तो काय करेल? तो कदाचित हार मानेल आणि म्हणेल, “मी काहीच बरोबर करत नाही.”

अपयश येतं तेव्हा तुमच्या मुलाला हे समजण्यासाठी मदत करा, की हार मानण्याऐवजी तो पुढच्या वेळी आणखी चांगलं कसं करू शकतो. असं केल्यामुळे दुःखी होण्याऐवजी तो समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल.

पण त्याच वेळी, तुम्ही तुमच्या मुलाची समस्या सोडवू नका. त्याऐवजी त्याला स्वतः त्याची समस्या सोडवता येईल अशा प्रकारे मदत करा. उदाहरणार्थ, तुमचा मुलगा शाळेत नापास झाला असेल तर तुम्ही त्याला विचारू शकता, “शाळेत शिकवला जाणारा एखादा विषय चांगल्या प्रकारे समजण्यासाठी तू काय करू शकतोस?”

वाईट गोष्टी घडतात तेव्हा . . .

बायबल तत्त्व: “उद्या तुमचे जीवन कसे असेल, हे तुम्हाला माहीत नाही.”—याकोब ४:१४.

जीवनात पुढे काय होईल याचा काही भरवसा नाही. एक व्यक्‍ती जी आज श्रीमंत आहे ती उद्या गरीब होऊ शकते. तसंच एखाद्याची तब्येत आज चांगली असेल पण पुढे जाऊन त्याला आजार होऊ शकतो. याविषयी बायबल असं म्हणतं: “वेगवंतांस धाव व बलवानांस युद्ध साधत नाही . . . परंतु समय व प्रसंग हे सर्वांना घडतात.”—उपदेशक ९:११, पं.र.भा.

पालक या नात्याने तुम्ही तुमच्या मुलाला धोक्यांपासून वाचवण्यासाठी तुमच्या परीने होईल ते प्रयत्न कराल. पण खरं पाहता, तुम्हाला नेहमीच तुमच्या मुलाचं प्रत्येक वाईट गोष्टीपासून संरक्षण करता येणार नाही.

तुमच्या मुलाला वाईट परिस्थितींचा सामना करावा लागतो तेव्हा तुम्ही त्याला मदत करू शकता. जसं की, मैत्री तुटणं किंवा कुटुंबातल्या एखाद्या सदस्याचा मृत्यू होणं. असं करून तुम्ही त्याला भविष्यासाठी तयार करत असाल. यामुळे मोठं झाल्यावर तो स्वतः जीवनातल्या समस्यांचा सामना करू शकेल. उदाहरणार्थ, नोकरी गमावणं किंवा आर्थिक रीत्या नुकसान होणं. *

तुमच्या मुलाला सुधार करण्यासाठी सांगितलं जातं तेव्हा . . .

बायबल तत्त्व: “सुबोध ऐक . . . म्हणजे आपल्या उरलेल्या आयुष्यांत तू सुज्ञपणे वागशील.”—नीतिसूत्रे १९:२०.

तुमच्या मुलाला जेव्हा कोणी सुधारतं तेव्हा त्याला घाबरवण्याची किंवा दुःखी करण्याची त्याची इच्छा नसते. उलट, तुमच्या मुलाला स्वतःत सुधार करता यावा म्हणून त्याला मदत करण्याची समोरच्याची इच्छा असते.

तुम्ही तुमच्या मुलाला दिलेला सल्ला स्वीकारण्यासाठी मदत करता तेव्हा तुम्हा दोघानांही फायदा होतो. जॉन नावाचे वडील म्हणतात: “मुलांची चूक जर सुधारण्यात आलीच नाही तर ते कधीच शिकणार नाहीत. त्यांच्या जीवनातल्या समस्या वाढतच जातील आणि पालक या नात्याने तुम्ही त्या सोडवतच राहाल. यामुळे तुमचं आणि मुलांचं, दोघांचंही जीवन कठीण होऊन जाईल.”

तुमच्या मुलाला सुधार करण्यासाठी सांगितलं जातं तेव्हा त्याला त्यातून फायदा व्हावा म्हणून तुम्ही त्याची कशी मदत करू शकता? शाळेत किंवा इतर कुठेही त्याची चूक सुधारली जाते तेव्हा असं म्हणू नका की त्याला सुधारण्याची गरज नव्हती. त्याऐवजी तुम्ही त्याला विचारू शकता:

  • “तुला सुधार करायला का सांगितलं असेल?”

  • “तू कशा प्रकारे सुधार करू शकतोस?”

  • “अशी परिस्थिती जर तुझ्यासमोर परत आली तर तू काय करशील?”

लक्षात असू द्या, तुमच्या मुलांनी सुधार करण्यासाठी दिलेला सल्ला स्वीकारला तर त्यांना फक्‍त आज नाही, तर मोठं झाल्यावरही मदत होईल.

^ परि. 21 “गम से गुज़र रहे बच्चों के लिए मदद” हा लेख सजग होइए!  ऑक्टोबर २०१२ यात पाहा.