व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देव आपली काळजी करतो हे जाणल्यामुळे तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो?

देव आपली काळजी करतो हे जाणल्यामुळे तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो?

देवाने खूप अद्‌भुत रीत्या आपल्या शरीराची रचना केली आहे. शरीरात जखम बरी करण्याची अगदी विलक्षण क्षमता आहे. जेव्हा एका सुदृढ शरीराला लागतं किंवा खरचटतं तेव्हा शरीर लगेच वाहणारं रक्‍त थांबवण्यासाठी कार्य करतं. त्या वेळी जखम बरी होण्यासाठी रक्‍तवाहिन्या रुंदावतात आणि उती बळकट होतात.

विचार करा: आपल्या सृष्टिकर्त्याने आपली रचना अशा प्रकारे केली आहे, ज्यात शरीराला झालेली जखम बरी करण्याची क्षमता आहे. मग आपल्या मनावर झालेल्या जखमा बरं करण्याचं अभिवचन तो नक्की पूर्ण करणार नाही का? बायबलच्या एका लेखकाने म्हटलं: “भग्नहृदयी जनांना तो बरे करतो; तो त्यांच्या जखमांना पट्ट्या बांधतो.” (स्तोत्र १४७:३) पण जर गतकाळातल्या किंवा आजच्या परिस्थितीमुळे तुम्हाला मानसिक त्रास होत असेल तर यहोवा आज आणि भविष्यात तुमच्या जखमांवर पट्ट्या बांधेल ही खातरी तुम्ही कशी बाळगू शकता?

देवाच्या प्रेमाबद्दल बायबल आपल्याला काय शिकवतं?

देव वचन देतो: “तू भिऊ नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे; घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे; मी तुला शक्‍ती देतो; मी तुझे साहाय्यही करतो.” (यशया ४१:१०) एका व्यक्‍तीला जेव्हा कळतं की यहोवाला तिची काळजी आहे, तेव्हा तिला मनःशांती मिळते आणि जीवनात येणाऱ्‍या वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यायला शक्‍ती मिळते. बायबलच्या एका लेखकाने, पौलने म्हटलं की ही मनःशांती म्हणजे, “सर्व समजशक्‍तीच्या पलीकडे असलेली देवाची शांती.” पौलने पुढे म्हटलं: “जो मला सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे सर्व गोष्टी करण्याची मला शक्‍ती मिळते.”—फिलिप्पैकर ४:४-७, ९, १३.

शास्त्रवचनं आपला विश्‍वास वाढवण्यासाठी मदत करतात. यामुळे मानवांसाठी असलेल्या यहोवाच्या अभिवचनांवर विश्‍वास ठेवण्यासाठी मदत होते. उदाहरणार्थ, प्रकटीकरण २१:४, ५ (पुढच्या पानावर हे वचन दिलं आहे) सांगतं, की तो काय करणार आहे आणि आपण त्याच्यावर भरवसा का ठेवू शकतो:

  • “तो [लोकांच्या] डोळ्यांतून प्रत्येक अश्रू पुसून टाकेल.” यहोवा आपली सर्व दुःखं आणि चिंता काढून टाकेल; अगदी अशा चिंताही ज्या इतरांना क्षुल्लक वाटतात.

  • स्वर्गात “राजासनावर बसलेला” सर्व सृष्टीचा सर्वसमर्थ राजा आपल्या शक्‍तीचा आणि अधिकाराचा वापर करून आपल्यावर दुःखाची सावली पडू देणार नाही आणि आपल्याला लागत असलेली मदत पुरवेल.

  • यहोवा हमी देतो की त्याची अभिवचनं “विश्‍वसनीय आणि खरी आहेत.” याचा अर्थ यहोवा आपल्या नावासाठी त्याचं अभिवचन नक्की पूर्ण करेल.

“‘तो त्यांच्या डोळ्यांतून प्रत्येक अश्रू पुसून टाकेल, आणि यापुढे मरण नसेल; तसंच शोक, रडणं किंवा दुःखही नसेल; कारण, आधीच्या गोष्टी नाहीशा झाल्या आहेत.’ आणि राजासनावर बसलेला म्हणाला: ‘पाहा! मी सर्व काही नवे करत आहे.’ पुढे तो असेही म्हणाला: ‘लिही, कारण ही वचने विश्‍वसनीय आणि खरी आहेत.’”—प्रकटीकरण २१:४, ५.

स्वर्गात राहणाऱ्‍या आपल्या पित्याच्या व्यक्‍तिमत्त्वाबद्दल आणि गुणांबद्दल, सृष्टी आणि बायबल आपल्याला माहिती देतात. देवाला एक जिवलग मित्र म्हणून जाणून घेण्यासाठी सृष्टी आपल्याला आमंत्रण देते. आणि बायबलमुळे हे आमंत्रण अगदी स्पष्ट होतं. त्यात म्हटलं आहे: “देवाच्या जवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल.” (याकोब ४:८) तसंच, प्रेषितांची कार्ये १७:२७ म्हणतं: “तो आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही.”

तुम्ही जसजसं देवाला जाणून घ्याल तसतसं तुम्हाला खातरी पटेल की “त्याला तुमची काळजी आहे.” (१ पेत्र ५:७) यहोवावर अशा प्रकारे भरवसा ठेवल्यामुळे आपल्याला कोणते व्यावहारिक फायदे होऊ शकतात?

जपानमध्ये राहणाऱ्‍या टोरु नावाच्या व्यक्‍तीचा विचार करा. त्याच्या आईने त्याचं संगोपन केलं. ती ख्रिश्‍चन होती. तरीही तो याकुझा नावाच्या हिंसक अशा एका जपानी माफियात सामील झाला. तो म्हणतो: “मला वाटायचं की देव माझा राग करतो. जेव्हा माझ्या आवतीभोवती असणाऱ्‍या, खासकरून माझ्या जवळच्या लोकांचा मृत्यू व्हायचा तेव्हा मला वाटायचं की देव मलाच शिक्षा करतोय.” टोरुने म्हटलं की अशा हिंसक वातावरणात राहिल्यामुळे तो “निर्दयी आणि कठोर झाला” होता. त्या वेळी असलेल्या आपल्या इच्छेविषयी तो म्हणतो: “तरुणपणी मी ठरवलं की माझ्यापेक्षा कुख्यात गुंड्याला मारून टाकायचं, मग स्वतः मरायचं आणि प्रसिद्धी मिळवायची.”

पण जेव्हा टोरु आणि त्याची पत्नी हॅना हिने बायबलचा अभ्यास सुरू केला तेव्हा त्याने आपल्या जीवनात आणि दृष्टिकोनात मोठमोठे बदल केले. हॅना म्हणते: “माझ्या पतीमध्ये होणारे बदल मी स्पष्टपणे पाहू शकत होते.” आता टोरु पूर्ण विश्‍वासाने म्हणू शकतो: “असा एक देव आहे जो आपल्या प्रत्येकाची काळजी घेतो. कोणीही मरावं अशी त्याची इच्छा नाही. तसंच, आपल्या चुकांसाठी मनापासून पश्‍चात्ताप करणाऱ्‍यांना क्षमा करण्याचीही त्याची इच्छा आहे. आपण ज्या गोष्टी कोणाला सांगू शकत नाही किंवा कोणाला समजणार नाहीत त्या तो ऐकतो. लवकरच देव सर्व समस्या, दुःख आणि यातना काढून टाकणार आहे. आजही तो अपेक्षेपलीकडे असलेली मदत आपल्याला पुरवतो. त्याला आपली काळजी आहे आणि समस्यांमध्ये असताना तो आपली मदत करतो.”—स्तोत्र १३६:२३.

टोरुच्या उदाहरणावरून आपल्याला समजतं, की देव लवकरच सर्व दुःख दूर करणार आहे. आणि तसं करण्याची त्याच्याकडे क्षमताही आहे. तो आपले सर्व अश्रू पुसून टाकेल. ही गोष्ट जाणल्यामुळे आपल्याला भविष्याबद्दल पक्की खातरी तर मिळतेच, पण त्यासोबत आपल्याला आजही चांगलं जीवन जगायला मदत होते. खरंच, देव दुःखाने भरलेल्या या जगातही आपली प्रेमळपणे काळजी करतो हे जाणल्यामुळे आपल्याला फायदा होतो.