व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रार्थना ऐकणाऱ्‍या देवाला आपल्या प्रार्थना ऐकायला खूप आवडतं.—स्तोत्र ६५:२

देवाला तुमच्या प्रार्थना ऐकायला खूप आवडतं

देवाला तुमच्या प्रार्थना ऐकायला खूप आवडतं

देवाने मानवांना प्रार्थना करण्याचं एक खास वरदान दिलं आहे. प्रार्थनेद्वारे आपण देवाशी बोलू शकतो आणि आपल्या मनातल्या भावना त्याच्याजवळ व्यक्‍त करू शकतो. देवाचा एक सेवक दावीद याने अशी प्रार्थना केली: “तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझ्याकडे सर्व मानवजाती येते.” (स्तोत्र ६५:२) देवाने आपली प्रार्थना ऐकावी आणि तिचं उत्तर द्यावं असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं. मग त्यासाठी आपली प्रार्थना कशी असली पाहिजे?

मनापासून प्रार्थना करा

तुम्ही देवाकडे प्रार्थना करता तेव्हा त्याच्यापुढे आपलं मन मोकळं करू शकता. दुसऱ्‍या शब्दांत सांगायचं झालं तर तुम्हाला जे काही वाटतं ते तुम्ही त्याला सांगू शकता. (स्तोत्र ६२:८) मनापासून केलेल्या अशा प्रार्थना ऐकायला देवाला खूप आवडतं.

देवाचं नाव घेऊन प्रार्थना करा

आज लोक प्रार्थना करताना देवाला वेगवेगळ्या प्रकारे हाक मारतात. जसं की प्रभू, परमेश्‍वर किंवा अल्लाह. पण या फक्‍त त्याच्या पदव्या आहेत, नाव नाही. पवित्र शास्त्रात देव स्वतः म्हणतो: “मी यहोवा आहे. हे माझे नाव आहे.” (यशया ४२:८, पं.र.भा. ) यहोवा हे नाव जवळपास ७,००० वेळा पवित्र शास्त्रात वाचायला मिळतं. देवाचे अनेक संदेष्टे प्रार्थना करताना याच नावाने त्याला हाक मारायचे. उदाहरणार्थ, अब्राहाम संदेष्ट्याने म्हटलं: “हे प्रभू यहोवा, मला हे वतन मिळेल हे मी कशावरून समजू?” (उत्पत्ति १५:८, पं.र.भा. ) आपणसुद्धा यहोवा हे नाव घेऊन देवाला प्रार्थना केली पाहिजे.

तुम्ही आपल्या स्वतःच्या भाषेत प्रार्थना करू शकता

आपण कोणत्याही भाषेत प्रार्थना केली तरी देव आपले विचार आणि भावना समजू शकतो. पवित्र शास्त्रात असं आश्‍वासन दिलं आहे, की “देव भेदभाव करत नाही, तर प्रत्येक राष्ट्रात जो कोणी त्याची भीती बाळगून योग्य ते करतो, त्याचा तो स्वीकार करतो.”—प्रेषितांची कार्ये १०:३४, ३५.

पण देवाकडून आशीर्वाद मिळवण्यासाठी फक्‍त प्रार्थना करणं पुरेसं नाही. तर त्यासोबत आणखी काहीतरी करायची गरज आहे. ते काय, हे आपण पुढच्या लेखात पाहू या.