व्हिडिओ पाहण्यासाठी

यहोवाचे साक्षीदार प्रोटेस्टंट आहेत का?

यहोवाचे साक्षीदार प्रोटेस्टंट आहेत का?

 नाही. आम्ही यहोवाचे साक्षीदार ख्रिस्ती आहोत, पण आम्ही स्वतःला प्रोटेस्टंट म्हणत नाही. का नाही?

 प्रोटेस्टंट पंथाला “रोमन कॅथलिक धर्मपंथाचा निषेध करणारी एक धार्मिक चळवळ” असे म्हटले जाते. कॅथलिक धर्मात जे शिकवले जाते त्याच्याशी आम्ही यहोवाचे साक्षीदार सहमत नाही हे खरे असले, तरी पुढील कारणांमुळे आम्ही स्वतःला प्रोटेस्टंट मानत नाही:

  1.  १. प्रोटेस्टंट पंथाच्या पुष्कळ शिकवणी बायबल नेमके जे शिकवते त्याच्या विरोधात आहेत. उदाहरणार्थ, बायबल त्रैक्याविषयी शिकवत नाही; उलट ते असे शिकवते की “एकच देव आहे.” (१ तीमथ्य २:५; योहान १४:२८) आणि बायबल स्पष्टपणे शिकवते की देव दुष्टांना नरकात टाकून त्यांना शिक्षा देत नाही, तर तो त्यांचा कायमचा नाश करेल.—स्तोत्र ३७:९; २ थेस्सलनीकाकर १:९, १०.

  2.  २. आम्ही कॅथलिक पंथाचा किंवा इतर कोणत्याही धार्मिक गटाचा निषेध करत नाही किंवा त्यांच्या शिकवणी सुधारण्याचा प्रयत्न करत नाही. याच्या अगदी उलट, आम्ही देवाच्या राज्याची सुवार्ता सांगतो आणि लोकांनी या सुवार्तेवर विश्‍वास ठेवावा यासाठी त्यांना मदत करतो. (मत्तय २४:१४; २८:१९, २०) इतर धार्मिक गटांच्या शिकवणींमध्ये सुधारणा करणे हा आमचा उद्देश नाही, तर प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना देवाबद्दल व त्याचे वचन बायबल याबद्दल शिकवणे हा आहे.—कलस्सैकर १:९, १०; २ तीमथ्य २:२४, २५.