व्हिडिओ पाहण्यासाठी

“मला ऐकायचं नाही,” असं म्हणणाऱ्‍या लोकांच्या घरी यहोवाचे साक्षीदार पुन्हा का जातात?

“मला ऐकायचं नाही,” असं म्हणणाऱ्‍या लोकांच्या घरी यहोवाचे साक्षीदार पुन्हा का जातात?

 देवावर आणि लोकांवर प्रेम असल्यामुळे यहोवाचे साक्षीदार सगळ्या लोकांना बायबलचा संदेश सांगतात. यामध्ये “मला ऐकायचं नाही” असं म्हणणारे लोकसुद्धा येतात. (मत्तय २२:३७-३९) देवाच्या मुलाने म्हणजे येशूने त्याच्या शिष्यांना ‘पूर्ण साक्ष द्यायला’ सांगितलं होतं. देवावर प्रेम असल्यामुळेच आम्ही त्याच्या मुलाच्या या आज्ञेचं पालन करतो. (प्रेषितांची कार्यं १०:४२; १ योहान ५:३) हे करण्यासाठी आम्ही बायबल काळातल्या देवाच्या संदेष्ट्यांसारखं एकदाच नाही तर बऱ्‍याचदा लोकांना संदेश सांगतो. (यिर्मया २५:४) लोकांवर प्रेम असल्यामुळेच आम्ही जीवन वाचवणारा “राज्याचा हा आनंदाचा संदेश” सगळ्यांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो; अगदी अशा लोकांपर्यंतसुद्धा ज्यांना आधी ऐकायचं नव्हतं.​—मत्तय २४:१४.

 ज्या घरात आधी ऐकलं नव्हतं अशा ठिकाणी पुन्हा गेल्यानंतर लोक सहसा ऐकतात असं आमच्या लक्षात आलंय. याची तीन कारणं आहेत.

  •   लोक घर बदलतात.

  •   घरातले इतर लोक आपल्या संदेशात आवड दाखवतात.

  •   लोक बदलतात. जागतिक घडामोडींमुळे किंवा वैयक्‍तिक परिस्थितीमुळे काहींना “देवाच्या मार्गदर्शनाची” गरज असल्याचं जाणवतं आणि ते बायबलच्या संदेशात आवड दाखवतात. (मत्तय ५:३) प्रेषित पौलप्रमाणे सुरुवातीला काही जणांनी जरी विरोध केला असला तरी नंतर त्यांचं मन बदलू शकतं.​—१ तीमथ्य १:१३.

 पण आमचा संदेश ऐकण्याची आम्ही कोणावर जबरदस्ती करत नाही. (१ पेत्र ३:१५) तर प्रत्येकाने उपासनेच्या बाबतीत स्वतः निर्णय घ्यावा असं आम्हाला वाटतं.—अनुवाद ३०:१९, २०.